RTN DOCTOR
RTN DOCTOR 
स्पॉटलाईट

रत्नागिरीत कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्यालाच कोरोनाची लागण झाल्याचा संशय

अमोल कलये

रत्नागिरी -  कोरोनाच्या रुग्णांना तपासताना डॉक्टरांनाचा कोरोना होण्याची सगळ्यात जास्त भीती आहे. अशातच रत्नागिरीतून एक धक्कादायक बातमी समोर येतेय. कोरोना रुग्णाची तपासणी कऱणाऱ्या डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणं आढळून आलेले आहेत. एका महिला डॉक्टरच्या बाबतीच हा प्रकार घडलाय. धक्कादायक म्हणजे या महिलेचे सॅम्प्सही चाचणीसाठी घेण्यात आले होते. मात्र ते पुढे पुण्याला पाठवण्यात आले नसल्याचाही आरोप कऱण्यात आला आहेत. या महिला डॉक्टरने जिल्हाधिकारी आणि पोलिस अधिक्षकांकडे तक्रारही करण्यात आली आहे. कोरोनाचा संसर्ग वेगान होत असताना आता या घटनेमुळे डॉक्टरांनाही जास्त खबरदारी घेण्याच्या आव्हानालाही तोंड द्यावं लागणार आहेत. 

रत्नागिरीत कोरोनाचा रुग्ण तीन दिवसांपूर्वी आढळून आला होता. दुबईतून आल्यानंतर कोरोनाचा संशयित म्हणून जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलेल्या व्यक्तीला करोना रोगाची लागण झाली. गुहागर तालुक्यातील श्रृंगारतळी येथील कोरोनाबाधित व्यक्ती आहे. जिल्ह्यातील या पहिल्या रूग्णामुळे आरोग्य आणि प्रशासकीय यंत्रणा आणखी सतर्क झाली आहे. दरम्यान, या रुग्णाची तपासणी करतानाच डॉक्टरलाही कोरोनाची लागण झाल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. 

हा रुग्ण आढळण्याआधीच रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात जमावबंदी करण्यात आली आहे. गर्दीमुळे कोरोना लगेच पसरतो. त्यामुळे आधीच खबरदारी बाळगण्यात येते आहे. आतापर्यंत महाराष्ट्रात कोरोनाचे 52 रुग्ण आढळून आले आहेत. आज आणखी 3 रुग्णांची वाढ झाल्याने एकच घबराट उडाली आहे. दरम्यान, 5 जणांना बरंदेखील करण्यात आल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटलं आहे. 

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून कोकण रेल्वेने देखील काही गाड्या बंद करण्याचा निर्णय घेतलाय. खबरदारीचा उपाय म्हणून कोकण रेल्वेने ही निर्णय घेतलाय. 23 मार्च पासून 1 एप्रिलपर्यंत या गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामध्ये लोकमान्य टिळक टर्मिनल-मडगाव डबलडेकर, लोकमान्य टिळक टर्मिनल - एर्नाकुलम - दुरांतो एक्सप्रेस या गाड्यांचा यामध्ये प्रामुख्याने समावेश आहे.

पाहा व्हिडीओ - 

RATNAGIRI CORONA COVID 19 INTERTANRIONAL INDIA MAHARASHTRA DOCTOR GET INFECTED MARATHI VIRAL

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Baramati Constituency : पुणे शहरातील 13 दुय्यम निबंधक कार्यालये दोन दिवस राहणार बंद, जाणून घ्या कारण

Buldhana Water Crisis: बुलढाणा जिल्ह्याला दुष्काळाच्या झळा... ४६ गावांमध्ये ४७ टँकर सुरू; पाण्यासाठी नागरिकांची वणवण

Nagpur Earthquake : नागपूर शहरात भूकंपाचे सौम्य धक्के, रिश्टर स्केलवर २.५ इतकी तीव्रता; नागरिकांमध्ये घबराट

उदयनराजे भाेसलेंसाठी अजित पवार, देवेंद्र फडणवीस साता-यात; शशिकांत शिंदेंसाठी शरद पवार आज पुन्हा पावसातील सभेच्या मैदानावरुन काेणती साद घालणार?

Lok Sabha 2024 : मविआ आणि महायुतीच्या ४ प्रमुख उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या नोटीसा; ४८ तासात हिशेब देण्याची सूचना

SCROLL FOR NEXT