Dhanashree Verma saam tv
Sports

Dhanashree dance Video : चहलने शेअर केलेल्या वर्ल्डकप सॉन्गवर पत्नी धनश्री थिरकली, पाहा व्हिडिओ

वर्ल्डकप सॉन्गवर चहलची पत्नी धनश्री वर्माचा भन्नाट डान्स, पाहा व्हिडिओ

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून टीम इंडिया विरोधी संघांचा सामना करण्यासाठी सज्ज झाली आहे. भारतानं सराव सामन्यात दमदार कामगिरी केल्यामुळं भारतीय चाहत्यांचा वर्ल्डकप (T20 world cup) पाहण्याचा उत्साह शिगेला पोचला आहे. अशातच आता टीम इंडियाच प्रसिद्ध फिरकीपटू युजवेंद चहलने (Yuzvendra chahal) एक गाणं शेअर केलं आहे. या वर्ल्डकप सॉन्गला चहलची पत्नी धनर्श्री वर्मानेही इन्स्टाग्रामवर शेअर केलं आहे. 'बल्ला चला , छक्का लगा...ये कप हमारा है घर लेकर आ...' असं या गाण्याचे बोल आहेत. (Yuzvendra chahal shared world cup song wife dhanashree verma dance video viral)

भारतीय क्रिकेट संघाचा स्टार लेग स्पिनर युजवेंद्र टीम इंडियासोबत (Team India) ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलियात वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असून टीम इंडियाचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध होणार आहे. पंरतु, याचदरम्यान चहने इन्स्टाग्रामवर वर्ल्डकप थिमचा सॉन्ग शेअर केला आहे. चहल वर्ल्डकपची तयारी करताना या व्हिडिओत दिसत आहे. तसंत तो नेट्समध्ये कसून सरावही करत आहे.

'बल्ला चला, छक्का लगा....'

चहलने वर्ल्डकप थिम सॉन्गचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. 'बल्ला चला, छक्का लगा...ये कप हमारा है घर लेकर आ, असं या गाण्याचं बोल आहेत. चहलने शेअर केलेला हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनीही या व्हिडिओवर कमेंट्सचा पाऊस पाडला आहे. तसेच क्रिकेटप्रेमींकडून वर्ल्डकपासाठी भरभरून शुभेच्छाही देण्यात येत आहेत.

धनश्रीचा वर्ल्डकपच्या गाण्यावर भन्नाट डान्स

चहलची पत्नी धनश्रीनेही हा वर्ल्डकपचा सॉन्ग तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. पण यामध्ये तिनं काही बदल केले आहेत. धनश्रीनं व्हिडिओ बदलला. बॅकग्राउंडमध्ये वर्ल्डकप सॉन्ग सुरु होताना दिसतोय, मात्र व्हिडिओमध्ये धनश्री स्वत: डान्स करताना दिसत आहे. तसंच तिनं टीम इंडियाची जर्सी घालून गाण्यावर जबरदस्त ठुमके लगावले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Cricket Match Explosion: क्रिकेट मॅच सुरू असताना भीषण स्फोट, संपूर्ण स्टेडिअम हादरले; एकाचा मृत्यू तर अनेक जण गंभीर

Ganpati Visarjan: गणेश विसर्जनाला गालबोट, गणरायाला निरोप देताना चौघे नदीत बुडाले; दोघांचा मृत्यू

Maharashtra Politics: कोकणात ठाकरे गटाला भलं मोठं खिंडार; विश्वासू समर्थकांचा पक्षाला 'जय महाराष्ट्र'

Ganesh Visarjan 2025 : माझ्या बाप्पाला घेऊन जाऊ नका; निरोप देताना चिमुकलीला अश्रू अनावर, VIDEO

Maharashtra Politics : एवढा पैसा कुठून आला काका? मंत्री सरनाईकांच्या टेस्ला कार खरेदीवर मराठी अभिनेत्याचा सवाल

SCROLL FOR NEXT