Yuvraj Singh Saam Tv
Sports

Yuvraj Singh : रक्ताच्या उलट्या झाल्या तरी देशासाठी खेळला, 2011 वर्ल्ड कप युवराजने गाजवला

युवराजने या सामन्यात शानदार शतक ठोकत 113 धावा केल्या होत्या.

साम टिव्ही ब्युरो

Yuvraj Singh Birthday: भारताचा सिक्सर किंग युवराज सिंग (Yuvraj Singh) आज त्याचा 41 वा वाढदिवस साजरा करतोय. युवराजने 17 वर्षाच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक विक्रम आपल्या नावे केले. भारताला 2007 टी 20 विश्वचषक आणि 2011 वनडे विश्वचषक जिंकवून देणाऱ्या टीमचा तो भाग होता. 2011 विश्वचषक तर युवराजसाठी खास होता. या विश्वचषकात युवराज कॅन्सरसारख्या गंभीर आजाराचा सामना करत होता.

मात्र देशासाठी कायपण या भावनेने अशा गंभीर परिस्थितीतही युवराज टीम इंडियाकडून खेळला. नुसता खेळला नाही तर संपूर्ण विश्वचषकात त्याने आपली छाप सोडली. विश्वचषकात तो प्लेअर ऑफ टुर्नामेंट देखील ठरला होता. एका सामन्यात तर त्याला रक्ताच्या उलट्या होत असतानाही तो मैदानात उतरला होता. स्वत:ला त्रास होत असतानाही युवराजने मैदातून बाहेर जाण्यास नकार दिला. (Sports News)

युवराजला वेस्ट इंडिजविरुद्धच्या ग्रुप स्टेजमधील सामन्याआधी चक्कर येत होती. मेडिकल टीमनेही युवराजला सामना न खेळण्याचा सल्ला दिला. मात्र त्याने नकार देत खेळण्याचा निर्णय घेतला. मैदानात फलंदाजीदरम्यान युवराजला रक्ताच्या उलट्या झाल्या.

यावेळी मैदानातील अंपायर्सनी युवराजला बाहेर जायचं आहे का? अशी विचारणाही केली. मात्र मी जर मैदानात बेशुद्ध होऊन पडलो तर मला रुग्णालयाता घेऊन जा, पण मला आता देशाला विश्वचषक जिंकून द्यायचा आहे, असं युवराजने म्हटलं होतं.

या सामन्यात युवराजने शानदार शतक ठोकलं होतं. युवराजने 113 धावा केल्या होत्या ज्यामुळे टीम इंडियाला 268 धावांचा टप्पा गाठता आला होता. युवराजने गोलंदाजीतही कमाल करत दोन विकेट घेतल्या होत्या. युवराजच्या याच खेळीच्या जोरावर टीम इंडियाने हा सामना 80 धावांनी जिंकला होता. तसेच या सामन्यात युवराज मॅन ऑफ द मॅच देखील ठरला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

एका पिंपळाच्या झाडाच्या पुनर्वसनाच्या प्रेरणेतून सांगलीत घडली हरित चळवळ: आमदार सुहास बाबर

Nashik Firing: हिरावाडीतील ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार, परिसरात भीतीचं वातावरण

Kalyan Crime: गार्डनमध्ये बसलेल्या तरुण-तरुणीवर जीवघेणा हल्ला, ४ ते ५ जणांनी मारहाण करत डोक्यात दारूच्या बाटल्या फोडल्या

Maharashtra News Live Update: नाशिकच्या हिरावाडी परिसरात ज्वेलर्सच्या दुकानात गोळीबार

Supreme Court: शेअरिंग कार, २ दिवस व्हर्च्युअल हेरिंग; इंधन बचतीच्या आवाहानानंतर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT