YASHASVI JAISWAL Twitter
Sports

IND vs BAN: जयस्वालने डाईव्ह मारत पकडला भन्नाट कॅच; अंपायरलाही विश्वास बसेना -VIDEO

Yashasvi Jaiswal Catch: भारत आणि बांगलादेश यांच्यातील दुसऱ्या कसोटी सामन्यात यशस्वी जयस्वालने शानदार झेल घेतला आहे. ज्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal Catch News: कानपूरच्या मैदानावर भारत आणि बांगलादेश यांच्यातील २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना सुरु आहे. या सामन्यात आकाश दीपने भारताला पहिला विकेट मिळवून दिला. त्याने जाकीर हसनला शून्यावर बाद करत माघारी धाडलं. दरम्यान जाकीर हसनला बाद करण्यासाठी यशस्वी जयस्वालने भन्नाट झेल घेतला. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

तर झाले असे की, भारतीय संघाची गोलंदाजी सुरु असताना, आकाश दीप ९ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी आकाशने टाकलेला चेंडू ऑफ स्टम्पच्या बाहेर पडला. या चेंडूवर फलंदाजाने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू बॅटची कडा घेत गलीमध्ये क्षेत्ररक्षण करत असलेल्या यशस्वी जयस्वालच्या हातात गेला.

हा झेल दिसतोय तितका सोपा नव्हता. वेगाने येणाऱ्या चेंडूवर जयस्वालला पुढच्या दिशेने डाईव्ह मारावी लागली. त्याने कुठलीही चूक न करता अचूक झेल टिपला. मात्र खात्री करण्यासाठी अंपायरने हा निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. अंपायरने रिप्लेमध्ये पाहिल्यानंतर फलंदाजाला मैदान सोडण्याचा इशारा केला.

ज्यावेळी जयस्वालने हा शानदार झेल टिपला. त्यावेळी फलंदाज जाकीर हुसेनला विश्वासच बसत नव्हता. त्यामुळे त्याने शेवटपर्यंत मैदाना सोडलं नव्हतं. अखेर अंपायरने निर्णय तिसऱ्या अंपायरकडे पाठवला. त्यावेळी डिआरएसमध्ये पाहिल्यानंतर अंपायरने त्याला बाद घोषित केलं.

या सामन्याासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत प्लेइंग ११: यशस्वी जयस्वाल, रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, रिषभ पंत (यष्टीरक्षक), केएल राहुल, रविंद्र जडेजा, आर अश्विन, आकाश दीप, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.

बांगलादेश प्लेइंग ११: शादमान इस्लाम, जाकिर हसन, नजमुल हुसेन शान्तो (कर्णधार), मोमिनुल हक, मुश्फिकुर रहीम, शाकिब अल हसन, लिटन दास (यष्टीरक्षक), मेहदी हसन मिराज, तेजुल इस्लाम, हसन महमूद, खालिद अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi Schools In Worli : दादर वरळीमधील मराठी Top 9 शाळांची नावे

Face Care: आठवड्यातून किती वेळा फेस स्क्रब केलं पाहिजे?

Maharashtra Live News Update: विठ्ठल रुक्मिणी मंदिर फुलांनी सजले

Marathi bhasha Vijay Live Updates : लाडक्या बहिणीचं पोर्टल बंद, आता नव्याने नोंदणी होणार नाही - ठाकरे

Raj-Uddhav Thackeray Photo: राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र, मराठी माणसाला जे हवं तेच झालं, पाहा PHOTO

SCROLL FOR NEXT