yashasvi jaiswal X/BCCI
Sports

Yashasvi Jaiswal Century: यशस्वी भव! खणखणीत षटकार ठोकत झळकावलं शतक

Yashasvi Jaiswal Century News: भारत आणि इंग्लंड यांच्यातील दुसऱ्या कसोटीत यशस्वी जयस्वालने खणखणीत षटकार खेचत आपलं शतक पूर्ण केलं आहे.

Ankush Dhavre

Yashasvi Jaiswal News In Marathi:

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना विशाखापट्टनमच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय भारतीय फलंदाजांनी सार्थ ठरवला आहे. दरम्यान सलामीला आलेल्या यशस्वी जयस्वालने खणखणीत षटकार खेचत आपलं शतक झळकावलं आहे.

जयस्वालचं यशस्वी शतक..

नाणेफेक जिंकल्यानंतर भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल ही जोडी डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आली होती. दोघांनी सुरुवात तर चांगली केली, मात्र रोहितला मोठी खेळी करता आली नाही.

रोहित अवघ्या १४ धावा करत माघारी परतला. त्यानंतर फलंदाजीला आलेल्या शुभमन गिलसोबत मिळून त्याने संघाची धावसंख्या पुढे नेली. मात्र गिललाही मोठी खेळी करता आली नाही. त्याने ३४ धावा करत पॅव्हेलियनची वाट धरली.

एकिकडे विकेट्स जात होते. तर दुसरीकडे यशस्वी जयस्वालने एक बाजू धरुन ठेवली होती. त्याने अय्यरसोबत मिळून संघाची धावसंख्या १५० पार पोहचवली. दरम्यान १५१ चेंडूंचा सामना करत त्याने ११ चौकार आणि ३ षटकारांच्या साहाय्याने आपलं शतक पूर्ण केलं. या खेळीदरम्यान त्याने इंग्लंडच्या फिरकी गोलंदाजांचा चांगलाच समाचार घेतला. (Cricket news in marathi)

हे त्याच्या कसोटी कारकिर्दीतील दुसरं शतक ठरलं आहे. यापूर्वी हैदराबाद कसोटीतही त्याला शतक पूर्ण करण्याची संधी होती. त्याने या सामन्यातील पहिल्या डावात ८० धावांची खेळी केली होती. अवघ्या २० धावांनी त्याचं शतक हूकलं होतं. मात्र या सामन्यातील दुसऱ्या डावात त्याला मोठी खेळी करता आली नव्हती. त्यामुळे भारतीय संघाला या सामन्यात २८ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता.अखेर दुसऱ्या सामन्यात त्याने आपलं शतक पूर्ण केलं आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Devendra Fadnavis : राज ठाकरेंचे आभार, बाळासाहेबांचा आशीर्वाद मलाच मिळाला; देवेंद्र फडणवीस असं का म्हणाले?

Amarnath Yatra Bus Accident : अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या भाविकांच्या वाहनांचा भीषण अपघात; 5 बस एकमेकांना आदळल्या, परिसरात खळबळ

Ashadhi Ekadashi: आषाढी एकादशीच्या उपवासात चुकूनही खाऊ नका हे ५ पदार्थ

Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचा वापर केला; ते युज अँड थ्रो करणारे, मेळाव्यानंतर भाजप नेत्याची जळजळीत टीका

Actress Father Death: प्रसिद्ध अभिनेत्रीच्या वडिलांवर गोळीबार, रूग्णालयात येत धाडधाड गोळ्या झाडल्या; प्रकृती चिंताजनक

SCROLL FOR NEXT