yashasvi jaiswal  saam tv
Sports

IND vs WI 2nd Test: जयस्वालची 'यशस्वी' घोडदौड सुरूच! दुसऱ्याच इनिंगमध्ये तोडला गब्बरचा 'हा' मोठा रेकॉर्ड

Yashasvi Jaiswal Record: या डावात अर्धशतक झळकावताच त्याने शिखर धवनचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 2nd Test Yashasvi Jaiswal Breaks Shikhar Dhawan Record: वेस्टइंडीज दौऱ्यावर युवा फलंदाज यशस्वी जयस्वालला भारतीय संघात स्थान दिलं गेलं आहे. त्याला डावाची सुरुवात करण्याची संधी मिळताच त्याने संधीचं सोनं केल्याचं पाहायला मिळालं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्याच डावात त्याने जोरदार शतक झळकावले होते. तर दुसऱ्या कसोटीतील पहिल्या डावातही त्याने दमदार अर्धशतकी खेळी केल्याचे पाहायला मिळाले आहे. दरम्यान या डावात अर्धशतक झळकावताच त्याने शिखर धवनचा मोठा विक्रम मोडून काढला आहे.

भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वालची जोडी मैदानात आली होती. या दोघांनी डावाची सुरुवात करताना शतकी भागीदारी केली.

कर्णधार रोहित शर्मा ८० धावा करत माघारी परतला. तर यशस्वी जयस्वालने ५७ धावांचे योगदान दिले. यासह यशस्वी जयस्वाल भारतीय संघासाठी कसोटी सामन्यातील पहिल्या २ डावात सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. (Yashasvi Jaiswal Record)

याबाबतीत त्याने दिग्गज फलंदाज शिखर धवनला मागे सोडलं आहे. आपल्या दुसऱ्या डावात अर्धशतक झळकावणाऱ्या यशस्वीने पहिल्याच डावात शतक झळकावले होते. (Latest sports updates)

भारतीय संघासाठी कसोटी क्रिकेटच्या पहिल्या २ डावात सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम रोहित शर्माच्या नावे आहे. त्याने २८८ धावा केल्या होत्या. तर दुसऱ्या स्थानी सौरव गांगुली आहे. सौरव गांगुलीने २६७ धावा केल्या होत्या.

आता तिसऱ्या स्थानी यशस्वी जयस्वाल विराजमान झाला आहे. त्याने आतापर्यंत २२८ धावा केल्या आहेत. तर शिखर धवनने २१० धावा केल्या होत्या.

यशस्वी जयस्वालला वेस्टइंडीजविरूद्ध सुरू असलेल्या पहिल्या कसोटीत पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. डॉमिनिका कसोटीतील पहिल्या डावात त्याने ३८७ चेंडूंचा सामना करत १७१ धावा केल्या होत्या.

या डावात त्याने १६ चौकार आणि १ षटकार मारला होता. या सामन्यात देखील त्याने रोहितसोबत शतकी भागीदारी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यातील खडकवासला प्रकल्पातील पाणीसाठा गतवर्षीपेक्षा १.२१ टीएमसीने कमी

Health Care : ठसका लागला की वरती बघायला का सांगतात ? कारण ऐकून तुम्ही सुद्धा चक्रवाल

Maharashtra Rain Alert: पाऊस धुमाकूळ घालणार! पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाड्यात तुफान पावसाचा अंदाज, कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?

Dhule Firing: गोळीबाराने धुळे हादरले; राजकमल टॉकीज परिसरात पोलिसांची नाकाबंदी

Bank Strike Postponed: दिलासादायक बातमी! ३ दिवसांचा देशव्यापी बँक संप पुढे ढकलला; IBA आणि बँक संघटनेच्या बैठकीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT