WWE superstar rock shared video saam tv
Sports

T20 World Cup : भारत-पाकिस्तानमध्ये महामुकाबला, WWE सुपरस्टार रॉकची तयारी, Video शेअर करून म्हणाला...

WWE रेसलिंग एंटरटेनमेंटचा सुपरस्टार रॉकने (ड्वेन जॉनसन) एक खास संदेश दिला आहे.

नरेश शेंडे

नवी दिल्ली : ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली असून क्वालिफाईंग सामन्यांची रंगत पाहायला मिळत आहे. भारताचा पहिला सामना पाकिस्तान (India vs Pakistan) विरुद्ध 23 ऑक्टोबरला होणार आहे. भारत आणि पाकिस्तान आमने-सामने येण्यापूर्वी WWE रेसलिंग एंटरटेनमेंटचा सुपरस्टार रॉकने (ड्वेन जॉनसन) एक खास संदेश दिला आहे. (WWE Superstar Rock (dwayne johnson) shared video ahead of india pakistan match)

भारत-पकिस्तान सामना पाहण्याची चाहत्यांची उत्सुकत शिगेला पोहोचली आहे. याच पार्श्वभूमीवर रॉकनेही एक व्हिडिओ शेअर केला आहे. या सामन्याची उत्सुकता क्रिकेटप्रेमींनाच नाही तर सर्व प्रकारच्या खेळातील दिग्गजांनाही लागली आहे. रॉकनेही एक व्हिडिओ शेअर करून मेसेज दिला आहे. हा व्डिडिओ ब्रॉडकास्टर चॅनल स्टार स्पोर्ट्सने शेअर केला आहे.

रॉकने शेअर केलेला व्हिडिओ वीस सेकंदांचा आहे. यामध्ये रॉकने म्हटलं आहे की, जेव्हा सर्वात मोठे विरोधक आमने सामने येतात, तेव्हा आख्ख जग थांबलं जातं. ही जंग एखाद्या सामान्य क्रिकेट सामन्यापेक्षा खूप मोठी आहे. आता भारत आणि पाकिस्तानची टक्कर होण्याची वेळ आहे. सर्वात मोठ्या महामुकाबल्याची वेळ.

भारत-पाकिस्तानचा संघ एकाच ग्रुपमध्ये

ऑस्ट्रेलियात 16 ऑक्टोबरपासून टी20 वर्ल्डकपची रणधुमाळी सुरु झाली आहे. सध्या क्वालिफाईंग सामने खेळवले जात आहेत. टीम इंडियाला पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरोधात खेळायचा आहे. दिवाळीच्या एक दिवस आधी हा सामना होणार आहे. भारतीय संघाला सुपर-12 च्या ग्रुप-बी मध्ये ठेवलं आहे.

या ग्रुपमध्ये भारताशिवाय पाकिस्तान,बांग्लादेश आणि दक्षिण आफ्रिका संघाचा समावेश आहे. तर दोन संघ क्वालिफाईंग राऊंडनंतर या ग्रुपमध्ये प्रवेश करतील. क्वालिफाईंग राऊंडचे ग्रुप-2 चा विजेता आणि ग्रुप-1 चा उपविजेत्या संघाला ग्रुप बी मध्ये स्थान मिळणार आहे.

टी20 वर्ल्डकपसाठी भारत-पाकिस्तानचा फुल स्क्वॉड

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), के एल राहुल (उप कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, दीपक हुड्डा, रिषभ पंत (विकेटकीपर), दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, आर. आश्विन,युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल, अर्शदीप सिंह, मोहम्मद शमी.

स्टॅंडबाय खेळाडू : श्रेयस अय्यर, रवी बिष्णोई, मोहम्मद सिराज, शार्दूल ठाकूर

पाकिस्तानचा संघ : बाबर आझम (कर्णधार), शादाब खान, आसिफ अली, हैदर अली, हारिस रऊफ, इफ्तिखार अहमद, खुशदिल शाह, मोहम्मद हसनैन, मोहम्मद नवाज, मोहम्मद रिजवान, मोहम्मद वसीम जूनियर, नसीम शाह, शाहीन शाह आफ्रिदी, शान मसूद, फखर जमां,

ट्रव्हलिंग रिझर्व : मोहम्मद हारिस, उस्मान कादिर आणि शाहनवाज दहानी

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Weight Gain : वजन वाढवण्यासाठी गाईचे दूध प्यावे की म्हशीचे दूध?

Dahi handi : एक गाव-एक दहीहंडी! पण फोडण्याची हटके पद्धत, इथे विहिरीत उडी मारून फोडली जाते दहीहंडी; Video

Maharashtra Live News Update: इंदापूरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ, 17 हुन अधिक नागरिकांचा घेतला चावा

Famous Actress Death : प्रसिद्ध अभिनेत्रीचा मृत्यू; पुण्यात घेतला अखेरचा श्वास, सिनेसृष्टीत शोककळा

Home Loan : होम लोन घेणाऱ्यांना जोरदार झटका! देशातील सर्वात मोठ्या बँकेनं वाढवले गृहकर्ज व्याजदर, EMI वाढणार

SCROLL FOR NEXT