south africa twitter
Sports

WTC Point Table: द. आफ्रिकेच्या विजयाने टीम इंडियाचं टेन्शन वाढलं! वर्ल्ड चॅम्पियन्सची तिसऱ्या स्थानी घसरगुंडी

SA vs SL 1st Test, WTC Points Table: दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये पहिल्या कसोटी सामन्याचा थरार रंगला. या सामन्यात श्रीलंकेला पराभवाचा सामाना करावा लागला आहे.

Ankush Dhavre

WTC Points Table: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये टफ फाईट सुरु होती. मात्र या शर्यतीत श्रीलंकेनेही मोठी आघाडी घेतली आहे. दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये कसोटी मालिकेचा थरार सुरु आहे.

या सामन्यात श्रीलंकेचा धुव्वा उडवताच दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे. तर ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी सरकला आहे.

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलची चुरस वाढली

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये जाण्यासाठी भारत, ऑस्ट्रेलिया,दक्षिण आफ्रिका, श्रीलंका आणि न्यूझीलंड या संघांमध्ये लढत सुरु आहे. दरम्यान दक्षिण आफ्रिकेने २ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या सामन्यात श्रीलंकेचा पराभव केल्यानंतर आता ऑस्ट्रेलियाला धक्का बसला आहे.ऑस्ट्रेलियाचा संघ तिसऱ्या स्थानी सरकला असून, भारतीय संघ अव्वल स्थानी कायम आहे.

दक्षिण आफ्रिकेची बाजी

या मालिकेतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने २३३ धावांनी विजय मिळवला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी पोहोचला आहे. दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेतील ९ सामन्यांपैकी ५ सामने जिंकले आहेत. तर ३ सामन्यांमध्ये या संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या संघाची विजयाची सरासरी आता ५९.२५ वर जाऊन पोहोचली आहे.

तर श्रीलंकेचा संघ पाचव्या स्थानी पोहोचला आहे. या संघाने १० सामने खेळले आहेत. यापैकी ५ सामने गमावले आहेत. तर अव्वल स्थानी असलेल्या भारतीय संघाने १५ पैकी ९ सामने जिंकले आहेत. भारतीय संघाची विजयाची सरासरी ६१.११ आहे. तर तिसऱ्या स्थानी असलेल्या ऑस्ट्रेलियाची विजयाची सरासरी ५७.६९ आहे.

दक्षिण आफ्रिकेचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव १९१ धावांवर आटोपला होता. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या श्रीलंकेचा डाव ४२ धावांवर आटोपला. दुसऱ्या डावात दक्षिण आफ्रिकेने ३६६ धावा करत श्रीलंकेसमोर विजयासाठी ५१६ धावांचं आव्हान ठेवलं. या धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा डाव २८२ धावांवर आटोपला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raigad: कारने वाहतूक पोलिसासह तिघांना उडवलं, मुंबई-गोवा महामार्गावरील थरारक घटना

Bhandara Accident: भीषण अपघातामध्ये उपसरपंचाचा मृत्यू, कारने दुचाकीला चिरडलं नंतर...

Kalyan Dombivli Water : कल्याण डोंबिवलीकरांसाठी महत्त्वाची बातमी! २ जून रोजी १२ तास पाणी पुरवठा राहणार बंद

आधारकार्डधारकांना मोफत इलेक्ट्रिक सायकल? इलेक्ट्रिक सायकलसंदर्भात मोदींची घोषणा?

देशात कागदी चलनाचे दिवस संपणार? RBI प्लास्टिकच्या नोटा चलनात आणणार?

SCROLL FOR NEXT