WTC points table latest update saam tv news
Sports

ICC WTC 2024 Point Table : WTCच्या गुणतालिकेत भारत अव्वल स्थानी, न्यूझीलंडचा ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवाचा टीम इंडियाला फायदा

ICC WTC 2024 Point Table : ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडसमोर 369 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं.

प्रविण वाकचौरे

ICC WTC 2024 :

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पॉइंट टेबलमध्ये टीम इंडियांने अव्वलस्थानी झेप घेतली आहे. ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा पराभव केल्याचा फायदा भारताला झाला आहे. तर न्यूझीलंडची घसरण झाली आहे. इंग्लंडविरुद्धच्या शेवटच्या कसोटीत भारताने विजय मिळवल्यास पॉइंट टेबलमधील स्थान आणखी पक्कं होईल.

ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडचा 172 धावांनी पराभव केला. वेलिंग्टनमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्युझीलंडसमोर 369 धावांचं लक्ष्य ठेवलं होतं. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा संघ 196 धावांत सर्वबाद झाला. (साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

ऑस्ट्रेलियाच्या या विजयामुळे टीम इंडियाने न्यूझीलंडला मागे टाकलं आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर न्यूझीलंडची पॉइंट टक्केवारी 75 वरून 60 टक्क्यांवर घसरली आहे. न्यूझीलंडने आतापर्यंत पाच कसोटी सामने खेळले असून तीन जिंकले आहेत.  न्युझीलंडचा संघ 36 गुणांसह दुसऱ्या स्थानावर घसरला आहे. (Cricket news in marathi)

भारताची टक्केवारी 64.58 आहे. भारताने 8 पैकी 5 सामने जिंकले आहेत आणि दोन गमावले आहेत. भारताचे 62 गुण आहेत. ऑस्ट्रेलियाची टक्केवारी 59.09 आहे. तर 78 गुण आहेत. ऑट्रेलियाने आतापर्यंत 11 कसोटी खेळले असून 7 सामने जिंकले आहेत. तर तीन सामन्यात पराभूत झाला असून एक कसोटी अनिर्णित राहिली आहे.

भारत विरुद्ध इंग्लंड शेवटचा सामना

येत्या 7 मार्चपासून भारत-इंग्लंड यांच्या शेवटचा कसोटी सामान खेळवला जाणार आहे. या सामन्यात भारताने इंग्लंडविरुद्ध विजय मिळवल्यास टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंटटेबलमध्ये अव्वल स्थान कायम राहिल. मात्र पाचवी कसोटी अनिर्णित राहिल्यास किंवा इंग्लंड जिंकल्यास ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांना भारताला मागे टाकण्याची संधी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vice President Election: उपराष्ट्रपतीपदाची निवडणूक गेमचेंजर ठरणार? रेड्डी की राधाकृष्णन, कोण मारणार बाजी?

फोनवर बोलणं, गाणं ऐकणं नकोच! PMPML च्या कंडक्टर- ड्रायव्हरसाठी नवे नियम

Workout Tips: सकाळी व्यायाम करायच्या आधी काय खावे?

Fact Check : कपड्यांच्या शोरूममध्ये भूत? व्हायरल व्हिडिओमागचं सत्य काय? VIDEO

Shocking : ऑनलाइन डेटा चोरी, महिलेचे नग्नावस्थेतील फोटो, व्हिडीओ व्हायरल; कंपनीवर खटला दाखल

SCROLL FOR NEXT