wtc saam tv
क्रीडा

WTC Final Scenario: दक्षिण आफ्रिकेचा टीम इंडियाला दे धक्का... WTC च्या शर्यतीतून बाहेर पडणार?

WTC Final Scenario For Team India: भारतीय संघावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमधून बाहेर पडण्याचं संकट आहे.

Ankush Dhavre

WTC Scenario For Team India: भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील ३ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील शेवटचा सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर सुरु आहे. या सामन्यापूर्वीच दक्षिण आफ्रिकेने भारतीय संघाचं टेन्शन वाढवलं आहे.

दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील दोन्ही सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवत, मालिका खिशात घातली. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतील स्थिती आणखी मजबूत केली आहे. त्यामुळे भारतीय संघासाठी तिसरा आणि शेवटचा सामना जिंकणं अतिशय महत्वाचं असणार आहे.

भारतीय संघासाठी कसं आहे समीकरण?

भारतीय संघ गुणतालिकेत सर्वात मजबूत स्थितीत होता. मात्र आता भारतीय संघावर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेतून बाहेर पडण्याचं टेन्शन आहे. भारतीय संघ इथून पुढे ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे.

न्यूझीलंडविरुद्धचा १ आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या पाचही सामन्यांमध्ये भारतीय संघाला विजय मिळवावा लागणार आहे. हे सर्व सामने जिंकले, तर भारतीय संघ सहज फायनलमध्ये प्रवेश करेल. तसं भारताला फायनलमध्ये जाण्यासाठी ६ पैकी ४ सामने जिंकावे लागणार आहेत.

कोणता संघ कितव्या स्थानी ?

बांगलादेशला २-० ने धुळ चारल्यानंतर दक्षिण आफ्रिकेचा संघ ५४.१७ टक्के सरासरीसह गुणतालिकेत चौथ्या स्थानी पोहोचला आहे. ६२.८२ टक्के सरासरीसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी आहे.

तर ६२.५० टक्के सरासरीसह ऑस्ट्रेलियाचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. तर फायनलमध्ये जाण्यासाठी प्रबळ दावेदार असलेला श्रीलंकेचा संघ ५५.५६ टक्के सरासरीसह गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे.

दक्षिण आफ्रिकेसाठी कसं असेल समीकरण?

दक्षिण आफ्रिकेला इथून पुढे ४ कसोटी सामने खेळायचे आहेत. हे चारही सामने जिंकले, तर दक्षिण आफ्रिकेचा संघ सहज फायनलमध्ये प्रवेश करेल. मात्र जर दक्षिण आफ्रिकेने ४ पैकी ३ सामने जिंकले, तरीदेखील हा संघ फायनलमध्ये प्रवेश करु शकतो. ३ सामने जिंकताच या संघाची सरासरी ६१.११ वर जाऊन पोहोचेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Poll: तुमसरमध्ये राजू कारेमोरे होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

महाराष्ट्राचा महानिकाल, निवडणूक निकालाचं हेडक्वार्टर SAAM TV

Maharashtra Election Result : महाराष्ट्र कुणाचा? मतमोजणी कधीपासून आणि कुठे पाहाल?

SCROLL FOR NEXT