Vinesh phogat twitter
Sports

Vinesh Phogat: विनेश फोगाटने अंतिम डाव टाकला! अपात्रतेच्या निर्णयाविरोधात CAS कडे मागितली दाद

Vinesh Phogat Appeals To CAS: भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने अपात्रतेच्या निर्णयानंतर CAS कडे दाद मागितली आहे.

Ankush Dhavre

भारतीय कुस्तीपटू विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील ५० किलो ग्रॅम वजनी गटातील फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र फायनलच्या सामन्यापूर्वी १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र ठरवण्यात आलं. त्यामुळे पदकाची दावेदार असलेल्या विनेशला रिकाम्या हाती परतावं लागलं आहे. त्यामुळे देशभरातून तिला न्याय मिळवून देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. दरम्यान इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विनेशने कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स (CAS) कडे अपील केले आहे.

विनेश फोगाटने पॅरिस ऑलिम्पिक २०२४ स्पर्धेत शानदार खेळ करून दाखवला. तिने वर्ल्ड नंबर १ खेळाडूला पराभूत करत फायनलमध्ये प्रवेश केला होता. मात्र ५० किलो ग्रॅम वजनी गटात केवळ १०० ग्रॅम वजन अधिक असल्याने तिला अपात्र घोषित करण्यात आलं आहे.

सिल्व्हर मेडल देण्याची केली मागणी

इंडिया टुडेने दिलेल्या वृत्तानुसार, विनेश फोगाटने सिल्व्हर मेडल देण्याची मागणी केली आहे. याबाबत कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्स आज (८ ऑगस्ट) निर्णय देऊ शकतो, असे म्हटले जात आहे. कोर्ट ऑफ आर्बिट्रेशन फॉर स्पोर्ट्सने निर्णय दिला आणि हा निर्णय जर विनेश फोगटच्या बाजूने लागला तर आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक असोसिएशनला विनेश फोगाटला संयुक्त सिल्व्हर मेडल द्यावं लागेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

Navi Mumbai - Kalyan: नवी मुंबईहून कल्याणला चुटकीसरशी पोहोचता येणार, वाहतूक कोंडीची कटकटच संपणार

Pregnancy Care : गरोदरपणात महिला मंदिरात जाऊ शकतात का?

Ashadh Wari: देवेंद्र फडणवीसांची पत्नी अमृतांसोबत फुगडी | VIDEO

SCROLL FOR NEXT