WPL 2024 playoffs scenario for royal challengers bangalore womens premier league  saam tv news
Sports

WPL 2024, Playoffs Scenario: गुजरातच्या विजयानं RCB चा मोठा फायदा! प्लेऑफमध्ये जाण्यासाठी करावं लागेल हे काम

Women's Premier League Playoffs: वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा आता रोमांचक वळवणार येऊन पोहोचली आहे. एकीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत.

Ankush Dhavre

WPL Playoffs Scenario For RCB:

वुमेन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धा आता रोमांचक वळवणार येऊन पोहोचली आहे. एकीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे दोन्ही संघ प्लेऑफसाठी पात्र ठरले आहेत. तर दुसरीकडे तिसऱ्या स्थानावर पोहचण्यासाठी ३ संघांमध्ये चुरशीची लढत सुरू आहे. ११ मार्च रोजी झालेल्या सामन्यात गुजरात जायंट्सने यूपी वॉरियर्सवर ८ धावांनी विजय मिळवला.

या विजयानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाच्या प्लेऑफमध्ये पोहचण्याच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या आहेत. तर यूपी वॉरियर्स आणि गुजरात जायंट्सला अजूनही प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा शेवटचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध रंगणार आहे. या सामन्यात मुंबईचा संघ रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला हरवून पहिल्या स्थानी जाण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. तर दुसरीकडे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ केवळ हा सामना जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. कारण रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाचा नेट रनरेट हा यूपी आणि गुजरात संघापेक्षा चांगला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने हा सामना केवळ गमावला तरीदेखील प्लेऑफमध्ये जाण्याची संधी असणार आहे. (Cricket news in marathi)

गुजरातचा संघ प्लेऑफमध्ये जाणार का?

यूपीचे सर्व सामने झाले आहेत. तर दुसरीकडे गुजरातचा एक सामना शिल्लक आहे. या सामन्यात यूपीला मोठ्या फरकाने विजय मिळवावा लागणार आहे. असं झाल्यास गुजरातचा संघ नेट रनरेटच्या बाबतीत यूपीला मागे सोडू शकतो. यासह प्लेऑफमध्येही एन्ट्री करू शकतो.

यापूर्वी मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सने प्लेऑफमध्ये आपलं स्थान निश्चित केलं आहे. मात्र दोन्ही संघांमध्ये पहिल्या स्थानी पोहचण्यासाठी चुरशीची लढत सुरू आहे. यादीत पहिल्या स्थानी असलेल्या संघाला थेट फायनलमध्ये प्रवेश मिळणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nitin Gadkari Case : नितीन गडकरींना धमकी, १०० कोटी खंडणीची मागणी; दोघांना ५ वर्षे तुरुंगवास

MSRTC Fare: एसटी बसचा प्रवास आणखी महागणार? परिवहन मंत्र्यांनी दिले तिकीट दरवाढीचे संकेत

IPS Officer Transfer: सातपुते, कृष्ण प्रकाश अन् मुंडेंसह २४ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, राज्याच्या प्रशासनात खळबळ

Buldhana Crime: बुलडाणा हादरले! नवऱ्याकडून बायकोची हत्या, कुऱ्हाडीने वार करत जागीच संपवलं

Maharashtra News Live Update: - केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्यापोस्टरची जाळपोळ... नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक..

SCROLL FOR NEXT