mumbai indians twitter
Sports

WPL 2024 Auction: WPL च्या आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा मास्टरप्लान! ऑक्शननंतर असा आहे संपूर्ण संघ

Mumbai Indians Squad For WPL 2024: या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यावर अधिक भर दिला आहे.

Ankush Dhavre

Womens Premier League 2024 Auction:

आगामी वुमन्स प्रीमियर लीग २०२४ स्पर्धेसाठी शनिवारी (९ डिसेंबर) खेळाडूंचा लिलाव पार पडला. या लिलावात मुंबई इंडियन्स संघाने गोलंदाज आणि अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात स्थान देण्यावर अधिक भर दिला आहे. या लिलावात मुंबई इंडियन्सने दोन गोलंदाज आणि तीन अष्टपैलू खेळाडूंना आपल्या संघात स्थान दिलं आहे.

मुंबई इंडियन्स फ्रेंचायजी २.१ कोटी रुपये घेऊन लिलावात उतरली होती. रक्कम कमी असतानाही मुंबईने दक्षिण आफ्रिकेची वेगवान गोलंदाज शबनीम इस्माईलवर १.२ कोटींची बोली लावली. शबनीम इस्माईलने २००७ मध्ये दक्षिण आफ्रिका संघासाठी पदार्पण केलं होतं. त्यामुळे तिला दक्षिण आफ्रिका संघासाठी खेळण्याचा १६ वर्षांचा अनुभव आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तिने ३०० गडी बाद केले आहेत.

शबनीम इस्माईलवर मोठी बोली लावल्यानंतर मुंबईने चार भारतीय खेळाडूंवर बोली लावली. त्यांनी संजना एसला १५ लाख, अमनदीप कौर, फातिमा जाफर आणि कीर्थाना बालाकृष्णनवर प्रत्येकी १०-१० लाखांची बोली लावत आपल्या ताफ्यात स्थान दिलं. अशाप्रकारे मुंबईने १.६५ कोटींची बोली लावत पाच खेळाडूंना आपल्या ताफ्यात स्थान दिलं.

१३ खेळाडूंना केलं होतं रिटेन..

मुंबई इंडियन्सने आगामी हंगामासाठी १३ खेळाडूंना रिटेन केलं होतं. या यादीत कर्णधार हरमनप्रीत कौरसह, हेली मॅथ्यूज,अमेलिया केर सारख्या स्टार खेळाडूंचा समावेश होता. या १३ खेळाडूंसाठी मुंबई इंडियन्सने १३.५ कोटीपैकी ११.४ कोटी रुपये खर्च केले होते. तर उर्वरित ५ खेळाडू खरेदी करण्यासाठी मुंबईकडे २.१ कोटी इतकी रक्कम शिल्लक होती. (Latest sports updates)

आगामी स्पर्धेसाठी असा आहे मुंबई इंडियन्सचा संघ:

अमनजोत कौर, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, हरमनप्रीत कौर, हेली मॅथ्यूज, हुमेरा काजी, इसाबेल वोंग, जिंतिमनी कलिता, नताली सिव्हर, पूजा वस्त्राकर, प्रियंका बाला, सेका इशाक, यास्तिका भाटिया, शबनीम इस्माइल, संजना एस, अमनदीप कौर, फातिमा जाफर, कीर्थाना बालाकृष्णन.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dhangar Reservation : आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; सुसाईड नोट आढळल्याने खळबळ

Maharashtra Live News Update : दिवाळीनिमित्त पुणे मेट्रोच्या वेळापत्रकात बदल

Diwali 2025 Don't Do: लक्ष्मीपूजनच्या रात्री चुकूनही करू नका 'ही' कामं; देवी लक्ष्मी होऊ शकते नाराज

Mahesh Manjrekar : महेश मांजरेकरांचा 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' चित्रपट वादाच्या भोवऱ्यात, नेमकं प्रकरण काय?

ISRO Recruitment: इस्त्रोमध्ये नोकरीची संधी; पगार १.७७ लाख रुपये; पात्रता काय? वाचा सविस्तर

SCROLL FOR NEXT