travis-head-catch saam tv news
Sports

Rohit Sharma Wicket Fact Check: रोहित शर्मा आऊट नव्हता? हेडने चिटींग केली; काय आहे सत्य? जाणून घ्या Fact Check

Travis Head Catch: वर्ल्डकपच्या फायनलमध्ये रोहित दमदार खेळ करत असताना हेडने त्याचा कॅच पकडला आणि त्याला बाद करुन माघारी धाडलं होतं.

Ankush Dhavre

Rohit Sharma Wicket Controversy:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेची फायनल होऊन काही दिवस उलटले आहेत. मात्र अजूनही भारतीय क्रिकेट फॅन्स या धक्क्यातून बाहेर येऊ शकलेले नाहीत. फायनलच्या सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून ६ गडी राखून पराभवाचा सामना करावा लागला.

या पराभवानंतर सोशल मीडियावर काही व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहेत, ज्यात रोहित शर्मा नॉट आऊट असल्याचा दावा केला जात आहे. मात्र खरंच रोहित शर्मा नॉट आऊट होता का? जाणून घ्या.

व्हिडिओ व्हायरल..

सोशल मीडियावर एखादा व्हिडिओ अपलोड झाला की,तो खरा आहे की खोटा याची पडताळणी न करता काही लोक शेअर करतात. भारत- ऑस्ट्रेलिया वनडे वर्ल्डकप स्पर्धेतील फायनल झाल्यानंतर रोहितचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे.

हा व्हिडिओ युट्युब चॅनेलवर शेअर करण्यात आला आहे. ज्यात असा दावा केला गेला आहे की, ट्रेविस हेडने रोहितला बाद करण्यासाठी जो कॅच पकडला होता, तो सुटला होता. त्यानंतर अंपायरने आणि तिसऱ्या अंपायरने ही कॅच पकडली गेली आहे की नाही, हे तपासून पाहिलं नाही. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, बॉलचा आणि जमिनीचा संपर्क झाला आहे. युट्यूबवर अपलोड करण्यात आलेला हा व्हिडिओ इंस्टाग्राम आणि फेसबूकवरही व्हायरल होत आहे.

काय आहे सत्य?

रोहित शर्माला बाद करण्यासाठी हेडने कॅच सोडला होता, हा दावा पूर्णपणे खोटा आहे. त्याने जेव्हा हा कॅच पकडला, त्यानंतरा हा व्हिडिओ अनेकदा मोठ्या स्क्रिनवर आला होता. त्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहु शकता की, ज्यावेळी त्याने कॅच पकडला तेव्हा बॉल आणि जमिनीचा कुठलाही संपर्क झाला नव्हता. या सामन्यात ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंनी गोलंदाजीत,फलंदाजीत आणि क्षेत्ररक्षणातही मागे सोडलं. त्यामुळेच ऑस्ट्रेलियाचा संघ १.३० लाख लोकांसमोर भारतीय संघावर विजय मिळवू शकला. (Latest sports updates)

व्हायरल व्हिडिओ फेक?

हे दावे व्हिडिओ व्हायरल करण्यासाठी आणि लाईक्स,सब्सक्राबर्स वाढवण्यासाठी केले जातात. रोहित हा भारतीय संघातील प्रमुख फलंदाज आहे. त्याने वर्ल्डकपच्या फायनलमध्ये ४७ धावांची खेळी केली होती. या डावातही तो तुफान फॉर्ममध्ये होता. मात्र त्याचवेळी हेडने त्याचा कॅच पकडत त्याला बाद केलं होतं. त्यावेळी भावनेच्या भरात क्रिकेट चाहत्यांनी हा व्हिडीओ शेअर केला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT