World Cup 2023 Live Score: Saam tv news
क्रीडा

ENG vs NZ: रूटने न्यूझीलंडची गोलंदाजी फोडून काढली! विजयाचा नारळ फोडण्यासाठी २८३ धावांचं आव्हान

World Cup 2023 Live Score: इंग्लंडच्या फलंदाजांनी या सामन्यात दमदार खेळ केला आहे.

Ankush Dhavre

England vs New zealand, world cup live score:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेला जोरदार प्रारंभ होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड या दोन्ही संघांमध्ये अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सुरू आहे.

या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना इंग्लंड संघाने २८२ धावा केल्या आहेत. तर न्यूझीलंड संघाला हा सामना जिंकण्यासाठी २८३ धावांची गरज आहे.

या सामन्यात न्यूझीलंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या इंग्लंड संघाला हवी तशी सुरूवात करता आली नव्हती. जॉनी बेअरस्टो ३३ तर डेविड मलान अवघ्या १४ धावा करत माघारी परतला.

तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आलेल्या जो रुटने संघाची धावसंख्या पुढे नेत ७७ धावा चोपल्या. तर जोस बटलरने ४३ धावांचं योगदान दिलं. (Latest sports updates)

इंग्लंडचा फलंदाजी क्रम पाहून असं वाटलं होतं की, इंग्लंडचा संघ या डावात मोठी धावसंख्या उभारणार,मात्र इंग्लंडला २८२ धावांवर समाधान मानावं लागलं आहे.न्यूझीलंडकडून गोलंदाजी करताना मॅट हेनरीने ४८ धावा खर्च करत सर्वाधिक ३ गडी बाद केले. तर ग्लेन फिलिप्सने १७ धावा खर्च करत २ आणि मिचेल सँटनरने ३७ धावा खर्च करत २ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

इंग्लंड: जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, हॅरी ब्रूक, जोस बटलर (यष्टीरक्षक,कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टन, मोईन अली, सॅम करन, ख्रिस वोक्स, आदिल रशीद, मार्क वुड

न्यूझीलंड: डेव्हॉन कॉनवे, विल यंग, ​​रचिन रवींद्र, डॅरिल मिशेल, टॉम लॅथम (यष्टीरक्षक,कर्णधार), ग्लेन फिलिप्स, मार्क चॅपमन, मिचेल सँटनर, जेम्स नीशम, मॅट हेन्री, ट्रेंट बोल्ट

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Election Result : महाराष्ट्रातील पहिले १० निकाल, कोण कुठे विजयी झाले?

Eknath Shinde : महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदेंनी मोजक्या शब्दात सांगितलं

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: रोहित पवार पिछाडीवर, राम शिंदे आघाडीवर

Baramati Election Result: निकालाआधीच बारामतीत उधळला गुलाल! ,सुनेत्रा पवारांवर JCB ने फुलांचा वर्षाव - VIDEO

Dombivali Vidhan Sabha : डोंबिवलीत मतदान केंद्रात ठाकरे पदाधिकारी कार्यकर्त्यांचा गोंधळ

SCROLL FOR NEXT