World cup 2023 ban vs afg live score bangaldesh need 157 runs to win twitter
क्रीडा

BAN vs AFG: बांगलादेशपुढे अफगाणिस्तानच्या फलंदाजांनी टाकल्या नांग्या; जिंकण्यासाठी १५७ धावांचं आव्हान

Ankush Dhavre

Bangladesh vs Afghanistan World Cup 2023:

वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत आज डबल हेडर सामन्यांचा थरार रंगणार आहे. पहिला सामना अफगाणिस्तान आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. धर्मशाळाच्या मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात प्रथम फलंदाजी करत असलेल्या अफगाणिस्तान संघाचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला आहे. बांगलादेश संघाला हा सामना जिंकण्यासाठी १५७ धावांची गरज आहे.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या अफगाणिस्तान संघाचा डाव अवघ्या १५६ धावांवर संपुष्टात आला आहे.

अफगाणिस्तान संघाकडून डावाची सुरूवात करण्यासाठी आलेल्या रहमनुल्लाह गुरबाज ४७ धावांची खेळी करत दमदार सुरूवात करून दिली होती. तर इब्राहिम जदरानने २२ धावांचं योगदान दिलं.

या दोघांमध्ये ४७ धावांची भागीदारी झाली.मात्र त्यानंतर कुठलाही फलंदाज खेळपट्टीवर टिकून धावा करू शकला नाही. अजमतुल्ला उमरझाईने २२ धावा केल्या. तर रहमत शाहने १८ आणि हसमतुल्लाह शाहिदीने १८ धावांची खेळी केली. (Latest sports updates)

बांगलादेशच्या गोलंदाजीबद्दल बोलायचं झालं तर, बांगलादेशकडून शाकिब अल हसनने ८ षटकात ३० धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर मेहदी हसनने ९ षटकात २५ धावा खर्च करत ३ फलंदाजांना माघारी धाडलं. तसेच शोरीफुल इसलामने २, तस्किन अहमदने १ आणि मुस्तफिजुर रहमानने १ गडी बाद केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT