india vs Pakistan (AI) saam tv
Sports

Ind vs Pak : भारत-पाकिस्तान यांच्यात पुन्हा महामुकाबला! कधी आणि कुठे रंगणार सामना?

India vs Pakistan match Women's Asia Cup 2026 : भारत आणि पाकिस्तान यांच्यात क्रिकेटच्या मैदानावर महामुकाबला होणार आहे. महिला आशिया कप स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आहे. २८ ऑगस्टपासून स्पर्धेला सुरुवात होईल. भारत विरुद्ध पाकिस्तान हा सामना सप्टेंबरमध्ये रंगणार आहे.

Nandkumar Joshi

भारत - पाकिस्तान क्रिकेटचा सामना म्हणजे थरार. खेळ असला तरी राष्ट्रप्रेम ओतप्रेत भरलेलं. मैदानाच्या बाहेर आणि मैदानातही...अवघ्या क्रिकेट विश्वाचं लक्ष लागून राहिलेला भारत-पाकिस्तान सामना पुन्हा रंगणार आहे. तो दिवसही ठरला आहे. महिला आशिया कप स्पर्धेत हा थरार बघायला मिळणार आहे.

ही स्पर्धा २८ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत असेल. यंदाची आशिया कप स्पर्धा यूएई म्हणजेच संयुक्त अरब अमिरातीत आयोजित करण्यात आली आहे. भारतीय संघ आपला पहिला सामना ३० ऑगस्टला खेळेल. भारत आणि पाकिस्तान महिला संघ पुन्हा आमनेसामने येतील. हा सामना ५ सप्टेंबरला होईल. नुकत्याच झालेल्या टी-२० वर्ल्डकपमध्ये दोन्ही संघ एकमेकांना भिडले होते. त्यात भारताने पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते.

महिला आशिया कप स्पर्धेचे टाइमटेबल

महिला आशिया कप २०२६ च्या वेळापत्रकाची घोषणा करण्यात आली. स्पर्धेचा पहिला सामना २८ ऑगस्टला होईल. फायनल १३ सप्टेंबरला होईल. ही स्पर्धा टी-२० फॉरमॅटमध्ये म्हणजेच २० षटकांच्या सामन्यांच्या स्वरूपात खेळवली जाईल. एकूण आठ संघ असतील. त्यामध्ये भारत आणि पाकिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, नेपाळ, मलेशिया, थायलंड आणि यूएईच्या संघांचा समावेश आहे. श्रीलंकेचा संघ डिफेंडिंग चॅम्पियन आहे.

संघांची लवकरच घोषणा

आशिया कप स्पर्धेच्या वेळापत्रकाची घोषणा झाली आहे. लवकरच संघांचीही घोषणा होईल. टी २० वर्ल्डकप संघाचे नेतृत्व करणाऱ्या हरमनप्रीत कौरच्या हातीच भारतीय संघाची कमान राहील अशी अपेक्षा आहे. भारताने पाकिस्तानचा पराभव केला असला, तरी उर्वरित कामगिरी साजेशी झाली नव्हती.

भारताचे सामने कधी?

टीम इंडियाचा पहिला सामना ३० ऑगस्टला थायलंडविरुद्ध होईल. तर दुसरा सामना ३ सप्टेंबरला हाँगकाँगविरुद्ध खेळेल. यानंतर ५ सप्टेंबरला भारत आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला होईल. या स्पर्धेत भारतीय संघ 'ग्रुप ए' मध्ये आहे. या गटात भारत, पाकिस्तान, थायलंड आणि हाँगकाँग आहेत.

भारत-पाकिस्तान सामना ५ सप्टेंबरला

भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना ५ सप्टेंबरला संध्याकाळी आठ वाजता सुरू होईल. भारतीय संघासमोर पाकिस्तान संघाचा कुठेच निभाव लागत नाही. मात्र, दोन्ही संघातील लढतीकडे पारंपरिक प्रतिस्पर्धी म्हणून पाहिले जाते. हा सामना ५ सप्टेंबरला (शनिवार) होईल. भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ८ वाजता सामना सुरू होईल. दुबई इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर हा महामुकाबला रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Toxic: यशच्या 'टॉक्सिक'ला बकवास म्हणणं प्रसिद्ध यूट्यूबरला पडलं महागात; थेट मिळाली कायदेशीर नोटीस

Fact Check : आधार कार्ड दाखवून ३ लाखांचे कर्ज, सरकारच्या अधिकृत स्पष्टीकरणाने उडाली खळबळ

Maharashtra News Live Update: एमपीएससी पेपर फुटी प्रकरणात मुंबई पोलिसांकडनं तपासाला गती

Gold Rate Today: रक्षाबंधनाला सोनं खरेदीची सुवर्णसंधी, 10 तोळा सोनं 31600 रुपयांनी स्वस्त; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

EPFO Update : नोकरी करणाऱ्या पती-पत्नींसाठी महत्त्वाची बातमी! लग्नानंतर EPFO खात्या संबंधित 'हे' एक काम करायला विसरलात? नंतर होईल गोंधळ

SCROLL FOR NEXT