ms dhoni video Saam TV
Sports

MS Dhoni Viral Video : ना ऑटोग्राफ, ना फोटोग्राफ, ना सेल्फी... महिला फॅनने थेट पाय धरले; धोनीच्या रिअ‍ॅक्शनने मन जिंकलं

Viral Video : चाहत्यांना जेव्हा धोनीला भेटण्याची संधी मिळते तेव्हा ते क्षणअविस्मरणीय बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

साम टिव्ही ब्युरो

MS Dhoni Viral Video :

टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी त्याची फॅन फॉलोईंग काही कमी होताना दिसत नाही. धोनी आणि त्याच्या चाहत्यांचं भावनिक नातं आहे. याची एक झलक नुकतीच दिसली. चाहत्यांना जेव्हा धोनीला भेटण्याची संधी मिळते तेव्हा तो क्षणअविस्मरणीय बनवण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.

अशाच एका महिला फॅनची माहीला भेटण्याची इच्छा नुकतीच पूर्ण झाली. मात्र त्यावेळी ऑटोग्राफ, फोटोग्राफ, सेल्फी असं काही दिसलं नाही. तर महिला फॅनने पहिलं धोनीच्या पायाला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. यावर धोनीची रिअॅक्शन जी सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. (Latest sports updates)

सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये एमएस धोनी खुर्चीवर बसलेला दिसत आहे. धोनी कुणाशी तरी बोलत असल्याचे दिसत आहे. दरम्यान, एक महिला फॅन त्याला भेटण्यासाठी तिथे पोहोचते आणि पुढे जाऊन धोनीच्या पायाला स्पर्श करते.

फॅनने पायाला स्पर्श केल्यामुळे धोनीलाही थोडं आश्चर्य वाटलं. मात्र लगेचच धोनीने हात पुढे करत हस्तांदोलन केलं. माहीसोबत हस्तांदोलन केल्यानंतर एकत्र फोटो घेताना महिला फॅन दिसत आहे. धोनीबद्दल असलेला आदरच त्याच्या चाहत्यांना खास बनवतो. हा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होताना दिसत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कोकण किनारपट्टीवर मासेमारीला ब्रेक

HSRP Number Plate Update: ... तर तुम्हाला भरावा लागणार ₹१००० चा दंड, HSRP नंबर प्लेटवर मोठी अपडेट

एक रुपया खर्च न करता किडनी आणि लिव्हर होईल स्वच्छ; सकाळी रिकाम्यापोटी प्या 'हे' ड्रिंक

Feeling Cold All The Time: तुम्हाला सतत थंडी वाजते? ही आहेत ६ कारणं

Pratapgad Fort : मराठ्यांच्या पराक्रमाचा अजरामर इतिहास, प्रतापगड किल्ल्याचे जुने नाव काय?

SCROLL FOR NEXT