Rohit Sharma Retirement Update saam tv
Sports

Rohit Sharma update : रोहित शर्मा वनडेमधून रिटायर होणार का? बीसीसीआयचा हिटमॅनच्या कोर्टात चेंडू, पडद्यामागे मोठ्या घडामोडी

rohit sharma odi retirement update : इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या वनडे सामन्यानंतर रोहित शर्मा निवृत्ती जाहीर करणार असल्याच्या चर्चांनी क्रिकेटविश्वात धुमाकूळ घातलाय. पण खरेच तो निवृत्ती घेणार का? याबाबत महत्वाची माहिती समोर आली आहे.

Nandkumar Joshi

इंग्लंडविरुद्धच्या दोन्ही वनडे सामन्यात साजेसा खेळ करण्यात अपयशी ठरलेला भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा तिसऱ्या वनडेनंतर क्रिकेटमधून निवृत्त होणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. लॉर्ड्समध्ये होणारा तिसरा वनडे सामना रोहितच्या कारकिर्दीतील अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असेही बोलले जात आहे. मात्र, याबाबत बीसीसीआयकडून असे कोणतेही संकेत देण्यात आलेले नाहीत. रोहित शर्माला २०२७ च्या वर्ल्डकपपर्यंत खेळायचे आहे हे स्पष्ट आहे. दुसरीकडे बीसीसीआयने देखील त्याच्यापर्यंत संदेश पोहोचवला आहे. बीसीसीआयने या निर्णयाबाबत त्याच्या कोर्टात चेंडू टाकला आहे, असे कळते.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील अखेरचा आणि तिसरा वनडे सामना १९ जुलैला लॉर्ड्सच्या मैदानात होणार आहे. दुसऱ्या वनडे सामना सुरू असतानाच, रोहित शर्माचा हा अखेरचा दौरा असेल, अशी चर्चा झाली. हा त्याचा अखेरचा आंतरराष्ट्रीय सामना असेल, असे बोलले जात आहे. आता रोहितच्या वनडे कारकिर्दीबाबत नवी माहिती समोर आली आहे.

रोहित शर्माला अजून क्रिकेट खेळायचा आहे. मात्र, रोहित इंग्लंड दौऱ्यानंतर भारतीय संघाच्या पुढील नियोजनाचा भाग नसेल, असे संकेत निवड समितीकडून देण्यात आल्याचे कळते. इंडियन एक्स्प्रेसच्या रिपोर्टनुसार, या मालिकेनंतर निवड समिती सदस्य टीम इंडियाच्या पुढील भवितव्याबाबत आणि वाटचालीबाबत विचार करत आहेत. दुसरीकडे रोहित शर्माने गेल्या काही दिवसांपासून फिटनेसवर कमालीचे लक्ष केंद्रीत केले आहे. मात्र, त्याच्या बॅटमधून धावा निघत नाहीत. भारतीय संघासाठी हा चिंतेचा विषय ठरला आहे. आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळायचे की नाही याचा सर्वस्वी निर्णय रोहित शर्माचा असेल. निवड समितीने या निर्णयाचा चेंडू रोहितच्या कोर्टात फेकला असल्याचे सांगण्यात येत आहे.

रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने २०२५ मध्ये आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचे जेतेपद पटकावले होते. पण त्यानंतरच्या मालिकेत त्याला कर्णधारपदावरून हटवण्यात आले आणि शुभमन गिलकडे नेतृत्व सोपवण्यात आले होते. रोहित शर्मा आता पुढील वनडे वर्ल्डकप खेळू शकणार नाही, अशी चर्चा सुरू झाली. पण स्वतः रोहित शर्माने अनेकदा पुढील वनडे वर्ल्डकप खेळण्याची इच्छा बोलून दाखवली आहे.

लॉर्ड्सवरील खेळी रोहितसाठी महत्वाची

वनडे वर्ल्डकप पुढील वर्षी होणार आहे. त्याचे वेळापत्रक अद्याप आलेले नाही. पण ऑक्टोबर ते नोव्हेंबर या कालावधीत ही सर्वात मोठी स्पर्धा होईल. याचाच अर्थ जवळपास दीड वर्ष आहे. तोपर्यंत रोहितही चाळिशी पार करेल. रोहित शर्माने अद्याप माघार घेतलेली नाही. पण धावा करणार नसेल तर कोणत्या आधारावर त्याला संघात स्थान मिळेल, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. रोहित शर्माला वनडे क्रिकेट खेळायचा आहे. लॉर्ड्सवरील खेळी त्याच्यासाठी अत्यंत महत्वाची असणार आहे. या सामन्यात तो कशी फलंदाजी करतो, यावर त्याचे पुढील भवितव्य अवलंबून असेल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर पुन्हा खड्ड्यांचे साम्राज्य

Rain Alert : राज्यात ऊन-सावल्यांचा खेळ; मराठवाड्यासह 'या' जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Nepal Floods: नेपाळमध्ये महाप्रलय! महापुरानंतर भूकंपाचे धक्के, मृतांचा आकडा ४०० वर; २९० भारतीय बेपत्ता

Rakshabandhan Horoscope: रक्षाबंधनाचा दिवस कोणत्या राशीसाठी ठरणार खास? भावंडांकडून मिळेल प्रेम, आनंद आणि मोठी खुशखबर!

चीनमुळे नेपाळमध्ये महाप्रलय? 300 जणांचा मृत्यू, शेकडो भारतीय बेपत्ता

SCROLL FOR NEXT