Will Rohit Sharma once again become captain of Team India's T20 team what-happened in- bcci meeting Saam TV
Sports

Team India: हार्दिक पंड्याचा पत्ता कट? रोहित पुन्हा बनणार टी-२० संघाचा कर्णधार; BCCI मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

Rohit Sharma Team India: शुक्रवारी बीसीसीआयची महत्वाची मिटिंग पार पडली. या मिटिंगमध्ये रोहित शर्माकडे पुन्हा एकदा टी-२० संघाचे कर्णधारपद देण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे.

Satish Daud

Rohit Sharma Team India

वनडे विश्वचषक स्पर्धेनंतर आता बीसीसीआयची नजर आगामी टी-२० विश्वचषक स्पर्धेवर आहे. आयपीएलचा हंगाम झाल्यानंतर वेस्ट इंडिजमध्ये टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. या स्पर्धेसाठी निवड समिती टप्याटप्याने खेळाडूंची चाचपणी करीत आहे. दरम्यान, शुक्रवारी बीसीसीआयची महत्वाची मिटिंग पार पडली.

या मिटिंगमध्ये रोहित शर्माकडे पुन्हा एकदा टी-२० संघाचे कर्णधारपद देण्याविषयी चर्चा झाल्याची माहिती आहे. त्यामुळे हार्दिक पंड्याचा पत्ता कट होणार आणि रोहित शर्मा पुन्हा टी-२० संघाचा कर्णधार बनणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सध्या हार्दिक पंड्याकडे टीम इंडियाच्या (Team India) टी-२० संघाचे कर्णधारपद आहे. पण काही दिवसांपासून हार्दिक पंड्या दुखापतग्रस्त आहे. त्यामुळे तो जवळपास ४ महिने क्रिकेटपासून लांब असणार आहे. हीच बाब लक्षात घेता बीसीसीआयने सूर्यकुमार यादवची हंगामी कर्णधार म्हणून निवड केली आहे.

हार्दिक थेट एप्रिल महिन्यात होणारी आयपीएल स्पर्धा खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. आयपीएलनंतर काही दिवसांतच टी-२० वर्ल्डकप स्पर्धा असल्याने एवढ्या कमी कालावधीत हार्दिकला संघाची घडी बसवणे जमणार नाही, असं बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्याचं म्हणणं आहे. (Latest sports updates)

दुसरीकडे सूर्यकुमार यादवला कर्णधारपदाचा फारसा अनुभव नाही. त्यामुळे टी-२० वर्ल्डकपसारख्या मोठ्या स्पर्धेत त्याच्याकडे कर्णधारपद ठेवण्याचे जोखीम बीसीसीआय घेणार नाही. रोहित शर्मा हा चाणाक्ष कर्णधार म्हणून ओळखला जातो. त्याला टी-२० चा चांगलाच अनुभव आहे.

नुकत्याच झालेल्या वनडे विश्वचषक स्पर्धेतही रोहितने भारतीय संघाला फायनलपर्यंत पोहचवलं होतं. सध्याच्या घडीला रोहित हाच कर्णधार म्हणून सर्वोत्तम पर्याय असल्याचे बीसीसीआयला माहिती आहे. त्यामुळे आता रोहितकडे पुन्हा टी-२० संघाचे कर्णधारपद येणार असल्याची चर्चा आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sonalee Kulkarni : ही दोस्ती तुटायची नाय! दीपिका-सोनालीची खास भेट, फोटो शेअर करत चाहत्यांना दिला सुखद धक्का

Maharashtra Live News Update: कुकडी प्रकल्पातील डिंभे धरण ५० टक्के भरले

हे वागणं बरं नव्हं! प्रवाशांनी खचाखच भरलेल्या मेट्रोत महिलेचा विचित्र डान्स; व्हिडिओ पाहताच नेटकऱ्यांनी डोक्याला लावला हात

Avoid With Tea: चहा प्यायचाय? मग 'या' गोष्टींसोबत कधीही पिऊ नका, आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

Friday Horoscope Update : काही गुपितं इतरांना सांगणे टाळा, वाचा आजचे राशीभविष्य

SCROLL FOR NEXT