ms dhoni twitter
Sports

MS Dhoni Injury: दुखापतग्रस्त धोनी RCB विरुद्धच्या सामन्यात खेळणार की नाही? व्हायरल फोटोमुळे चर्चेला उधाण

MS Dhoni Injury Update: आज एमएस धोनी खेळणार का? याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

Ankush Dhavre

RCB VS CSK IPL 2023: आज आयपीएल स्पर्धेत एक रोमांचक सामना पार पडणार आहे.या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळूरु आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. साऊदर्न डर्बीतील या सामन्यात दोन्ही संघांमधे विजय मिळवण्यासाठी जोरदार लढत पाहायला मिळू शकते.

मात्र चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या फॅन्सला पडलेला प्रश्न म्हणजे आज एमएस धोनी खेळणार का? याबाबत आता एक मोठी माहिती समोर आली आहे.

चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी हा संघातील प्रमुख खेळाडू आहे. आयपीएल स्पर्धा सुरु झाल्यापासुनच एमएस धोनी दुखापतग्रस्त असल्याची चर्चा सुरु आहे. कारण ओपनिंग सामन्यापूर्वी त्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता.

ज्यात तो लंगडताना दिसून आला होता. त्यानंतर गेल्या सामन्यात देखील चेन्नईची फलंदाजी सुरु असताना धोनी लंगडताना दिसून आला होता. त्यामुळे धोनी पुढील सामन्यातून बाहेर होणार का? अशा चर्चा रंगायला सुरुवात झाली होती. (Ms Dhoni Injury)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्व होणाऱ्या सामन्यापूर्वी एमएस धोनीचा एक फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे. या फोटोमध्ये एमएस धोनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यापूर्वी सराव करताना दिसून आला आहे. (Will Dhoni Play Todays Match)

हा फोटो पाहून नक्कीच चेन्नई सुपर किंग्ज संघातील चाहत्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला असेल. त्यामुळे आज चिन्नस्वामीच्या मैदानावर धोनीची फटकेबाजी पाहायला मिळू शकते. (Latest sports updates)

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११ (RCB VS CSK PLAYING 11)

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू:

फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, एमके लोमरोर, ग्लेन मॅक्सवेल, वनिंदू हसरंगा, शाहबाज अहमद, वॅन पारनेल, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), मोहम्मद सिराज, हर्षल पटेल, विजयकुमार विशक

चेन्नई सुपर किंग्ज:

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे,मोईन अली, अजिंक्य रहाणे, मोईन अली, रवींद्र जडेजा, शिवम दुबे, मगाला, एमएस धोनी, तुषार देशपांडे, थिक्षणा , आकाश सिंग

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vladimir Putin : अमेरिकाविरोधात रशियाचा इराणला जाहीर पाठिंबा, व्लादिमीर पुतीन म्हणाले...

Obesity health risks: सडपातळ दिसणाऱ्यांमध्येही लठ्ठपणाचा धोका; शरीराला आतून पोहोचतोय धोका; या तपासण्या नियमित करा

Bollywood Celebrity: अमिताभ बच्चन ते सलमान खान; प्रॉपर्टी भाड्याने देऊन लाखो कमावतात हे बॉलिवूड सेलिब्रिटी

Force 3 : अ‍ॅक्शनचा डबल डोस घेऊन येतोय 'फोर्स 3' ; जॉन अब्राहमसोबत झळकणार 'हा' सुपरस्टार, शूटिंग सेटवरील VIDEO समोर

Maharashtra Politics : अकोल्यात काँग्रेसला मोठा धक्का, जिल्हाअध्यक्षांनी दिला राजीनामा, कारण आले समोर

SCROLL FOR NEXT