IPL 2024 Saam tv news
क्रीडा

IPL 2024: आयपीएलचं आयोजन भारताबाहेर होणार? क्रिकेटप्रेमींची निराशा होणार? कारण...

Ankush Dhavre

IPL 2024 Latest Updates:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. मात्र ही स्पर्धा केव्हा सुरु होणार याबाबत कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. २०२४ मध्ये भारतात लोकसभा निवडणूकांचा बिगुल वाजणार आहे.

याच कालावधीत आयपीएल स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मात्र लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर न झाल्याने आयपीएल स्पर्धेच्या तारखा समोर येऊ शकलेल्या नाही.

पीटीआयने दिलेल्या माहितीनूसार, निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणूकांच्या तारखा जाहीर केल्यानंतर आयपीएलच्या वेळापत्रकाबाबत निर्णय घेण्यात येईल. त्यामुळे आयपीएल भारतात होणार का? की आयपीएल स्पर्धेतील काही सामने भारताबाहेर खेळवले जातील? हा निर्णय निवडणूकांच्या तारखा समोर आल्यानंतर घेतला जाईल.

यापूर्वीही लोकसभा निवडणूकांमुळे आयपीएल स्पर्धेचे आयोजन भारताबाहेर करण्यात आले आहे. २००९ मध्ये या स्पर्धेचे आयोजन दक्षिण आफ्रिकेत केले गेले होते. तर २०१४ मध्ये झालेल्या लोकसभेच्या निवडणूकांमुळे हा या स्पर्धेतील पहिल्या टप्प्यातील सामन्यांचे आयोजन यूएईत केले गेले होते. यावेळी आयपीएल गव्हर्निंग कौन्सिल या स्पर्धेबाबत काय निर्णय घेणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. (Latest sports updates)

आयपीएल २०२४ लिलाव..

आयपीएल २०२४ स्पर्धेतील खेळाडूंचा लिलाव येत्या १९ डिसेंबर रोजी पार पडणार आहे. या लिलाव सोहळ्याचे आयोजन यूएईत केले जाणार आहे.

केव्हा होणार सुरुवात?

माध्यमातील वृत्तांमध्ये असं म्हटलं गेलं आहे की, आयपीएल २०२४ स्पर्धेचे आयोजन २४ मार्च ते २६ मे दरम्यान केले जाऊ शकते. टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा ही देखील आयपीएल स्पर्धेच्या आयोजनात मोठा अडथळा निर्माण करु शकते. कारण ४ जूनपासून टी-२० वर्ल्डकप स्पर्धेला प्रारंभ होणार आहे. त्यामुळे कुठल्याही परिस्थितीत आयपीएल स्पर्धा टी-२० वर्ल्डकप सुरु होण्याच्या १ आठवड्यापूर्वी समाप्त होणं गरजेचं आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bigg Boss Marathi : कालपर्यंत कडू होतं? निक्कीचा अरबाजला सवाल, बिग बॉसच्या घरात नेमकं काय चाललंय?

Maharashtra News Live Updates: मनोज जरांगेंची प्रकृती खालावली, उपचार घेण्यास नकार

निवडणुकीआधीच महायुतीला मोठा धक्का, मित्रपक्षाने साथ सोडली, माजी मंत्र्याची भरसभेत घोषणा!

Hair Care Tips : ऐन तारुण्यात केस पांढरे झालेत? वाचा या मागचं खरं कारण

Mahad News : बिल थकविल्याने विज पुरवठा केला खंडीत; महावितरणच्या कर्मचाऱ्याला मारहाण

SCROLL FOR NEXT