rahul dravid  saam tv
Sports

WTC FINAL 2023: गेली १० वर्षे भारतीय संघ ICC ची ट्रॉफी का जिंकू शकला नाही? स्वतः राहुल द्रविडने सांगितलं कारण

Rahul Dravid On WTC Final 2023: मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी मोठं भाष्य केलं आहे.

Ankush Dhavre

IND VS AUS WTC FINAL 2023: वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा (World Test Championship) अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात भारतीय संघाला दारुण पराभवाचा सामना करावा लागला आहे. जेतेपद मिळवण्यासाठी भारतीय संघाला ४४४ धावांची गरज होती. मात्र भारतीय संघाला अवघ्या २३४ धावा करता आल्या.

हा सामना भारतीय संघांने तब्बल २०९ धावांनी गमावला. यासह आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची प्रतीक्षा आणखी लांबणीवर गेली आहे. याबाबत बोलताना मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) यांनी मोठं भाष्य केलं आहे.

भारतीय संघ गेल्या १० वर्षांपासून आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकु शकला नाही. सेमी फायनल आणि फायनलमधून भारतीय संघाला बाहेर पडावं लागलं आहे. हा सामना झाल्यानंतर समालोचन करत असलेल्या सौरव गांगुली यांनी राहुल द्रविडला काही प्रश्न विचारले आहेत.

सौरव गांगुली यांनी राहुल द्रविड यांना नाणेफेक जिंकून गोलंदाजी घेण्याबाबत प्रश्न विचारला. याबाबत बोलताना ते म्हणाले की, ' आम्ही वातावरण, खेळपट्टी आणि खेळपट्टीवर आलेली हिरवळ पाहून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. आम्हाला असं वाटलं होतं की, इथे फलंदाजी करणं सोपं असेल. गेले काही सामने पाहिले तर नाणेफेक जिंकणाऱ्या संघांनी हाच निर्णय घेतला आहे.' (Latest sports updates)

तसेच ते पुढे म्हणाले की, ' आम्हाला वाटलं हा योग्य निर्णय आहे. कारण ऑस्ट्रेलियाचे ३ फलंदाज अवघ्या ७० धावसंख्येवर माघारी परतले होते. त्यानंतर पुढील २ सत्रात आम्ही अतिरिक्त धावा खर्च केल्या. आम्ही जर त्यांना ३०० वर ऑल आऊट केलं असतं तर सामन्यात टिकून राहू शकलो असतो.

तसेच ट्रॉफी न जिंकण्याबाबत प्रश्न विचारण्यात आला, त्यावेळी राहुल द्रविड म्हणाले की, ' आम्ही जवळ पोहोचतोय. आम्ही सेमीफायनल, फायनल गाठतोय. मात्र गेल्या ५ दिवसात आम्ही आमची सर्वोत्तम कामगिरी करू शकलो नाही. यावर आम्ही नक्कीच विचार करू.'

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mardaani 3 OTT : घराला बनवा सिनेमा हॉल; पाहा 'मर्दानी 3'च्या ॲक्शनचा थरार, चित्रपट ओटीटीवर कुठे अन् कधी रिलाज होणार?

Budget 2026 Live Updates: पेट्रोल डिझेलचे दर वाढणार की कमी होणार? अर्थसंकल्पात घोषणा होण्याची शक्यता

Maharashtra Live News Update: भंडाऱ्यात किल्ला पहाण्यासाठी आलेल्या दोन तरूणांचा बुडून मृत्यू

अर्थसंकल्पाआधीच शेअर बाजार कोसळला, सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांची धाकधूक वाढली

Gold Silver Rate Today: अर्थसंकल्पाआधीच गुडन्यूज! सोनं ₹१३००० तर चांदी २७००० रुपयांनी घसरली

SCROLL FOR NEXT