gautam gambhir twitter
क्रीडा

Gautam Gambhir Press Conference: ऋतुराज अन् अभिषेकला संघातून का काढलं? गौतम गंभीरने सांगितलं कारण

Gautam Gambhir On Ruturaj Gaikwad And Abhishek Sharma: श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेतून ऋतुराज गायकवाड आणि अभिषेक शर्माला वगळण्यात आलं आहे.

Ankush Dhavre

भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांचा थरार रंगणार आहे. या मालिकेतून गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षक म्हणून पदार्पण करताना दिसून येणार आहे. या दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि मुख्य निवडकर्ते अजित आगरकर यांनी पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी ऋतुराज गायकवाडला संघातून का काढलं? यामागचं कारण सांगितलं आहे.

भारत आणि श्रीलंका यांच्यात होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी मराठमोळ्या ऋतुराज गायकवाडला आणि अभिषेक शर्माला भारतीय संघात स्थान देण्यात आलेलं नाही. याबाबत प्रश्न विचारला असता गंभीर म्हणाला की, ' संघातून बाहेर करण्यात आलेल्या प्रत्येक खेळाडूला वाईट वाटणं साहजिकच आहे. तुम्ही रिंकू सिंगकडे पाहू शकता. टी-२० वर्ल्डकपपूर्वी खरंच शानदार कामगिरी केली होती. मात्र त्याला संधी मिळाली नव्हती.आम्ही केवळ १५ खेळाडूंची निवड करु शकतो.'

अभिषेक शर्मा आणि ऋतुराज गायकवाड यांनी आयपीएल २०२४ स्पर्धेत दमदार कामगिरी केली होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या भारत-झिम्बाब्वे टी-२० मालिकेतही दोघांची बॅट चांगलीच तळपली. पहिल्या सामन्यात शून्यावर माघारी परतल्यानंतर पुढील सामन्यात अभिषेकने पहिलं शतक झळकावलं होतं. तर ऋतुराज गायकवाडने मालिकेतील ४ सामन्यांमध्ये १३३ धावा कुटल्या होत्या. मात्र तरीही श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेतून या दोघांना वगळण्यात आलं आहे.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुभमन गिल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, रिंकू सिंग, रियान पराग, रिषभ पंत, संजू सॅमसन, हार्दिक पंड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, रवि बिश्नोई, अर्शदीप सिंग, खलील अहमद आणि मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर.

श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, मोहम्मद सिराज, वॉशिंग्टन सुंदर, अर्शदीप सिंग, रियान पराग, अक्षर पटेल, केएल राहुल, रिषभ पंत, श्रेयस अय्यर, शिवम दुबे, कुलदीप यादव, खलील अहमद, हर्षित राणा

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur Crime News : कोल्हापूरच्या आदमापूर येथे गोळीबार; पोलिसांनी घेतले एकाला ताब्यात

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results : बारामतीमधून अजित पवार आघाडीवर

Allu Arjun : अल्लू अर्जुनचा 'पुष्पा 2' वादाच्या भोवऱ्यात; हिंदूंच्या भावना दुखावल्याचा आरोप, नेमकं कारण काय?

Naga Chaitanya: कोट्यवधींचा मालक असूनही नागा चैतन्य करणार नाही धूमधडाक्यात लग्न, कारण काय...

Baramati Politics: बारामतीचा पहिला कल हाती, युगेंद्र पवारांची सरशी

SCROLL FOR NEXT