hardik-pandya saam tv news
क्रीडा

Hardik Pandya: गुजरात सोडून हार्दिक मुंबईत का गेला? धक्कादायक कारण आलं समोर

Hardik Pandya News: गुजरातला पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनवणारा आणि दुसऱ्या हंगामात फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरातने का जाऊ दिलं? जाणून घ्या काय आहे कारण.

Ankush Dhavre

Why Hardik Pandya Traded To Mumbai Indians:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु व्हायला अवघे काही महिने शिल्लक राहिले आहेत. येत्या १९ डिसेंबर रोजी दुबईत या स्पर्धेचा लिलाव सोहळा पार पडणार आहे. या लिलाव सोहळ्यापूर्वी हार्दिक पंड्याने सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला आहे. गुजरात टायटन्स संघाचं कर्णधारपद सोडून हार्दिक पंड्या मुंबई इंडियन्स संघात परतला आहे.

गुजरातने हा ट्रेड सक्सेसफुल करण्यासाठी मुंबई इंडियन्सकडून १५ कोटी रुपये घेतले आहेत. दरम्यान तुम्हालाही प्रश्न पडला असेलच की गुजरातला पहिल्याच हंगामात चॅम्पियन बनवणारा आणि दुसऱ्या हंगामात फायनलपर्यंत पोहचवणाऱ्या हार्दिक पंड्याला गुजरातने का जाऊ दिलं? जाणून घ्या काय आहे कारण.

हार्दिक पंड्याने सोडली गुजरातची साथ..

हा ट्रेड झाल्यानंतर असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे की, हार्दिक पंड्यासारख्या मॅचविनर खेळाडूला गुजरातने का सोडलं? माध्यमातील वृत्तानुसार, हार्दिक पंड्याने गुजरात टायटन्सचे मालक CVC कॅपिटल पार्टनर्सकडून जाहिरात करण्यासाठी अधिक पैशांची मागणी केली होती. ही मागणी फेटाळताच हार्दिकने मुंबई इंडियन्सशी संपर्क केला. मुंबई इंडियन्सला ऑल राऊंडरची गरज होती, त्यामुळे त्यांनी ही ऑफर स्विकारली.' (Latest sports updates)

टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गुजरात टायटन्स संघाची मॅनेजमेंट आणि हार्दिक पंड्या यांच्यात मतभेद होते. त्यामुळे त्याने गुजरात टायटन्स सोडून मुंबई इंडियन्स संघात प्रवेश केला असल्याचं म्हटलं जातं आहे. वर्ल्डकप सुरू होण्याच्या काही महिन्यांपूर्वीच हार्दिक पंड्या आणि मुंबई इंडियन्स यांची या विषयावरून चर्चा होती असं म्हटलं जातं आहे.

ग्रीनचा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुत प्रवेश..

हार्दिक पंड्याला मुंबई इंडियन्स संघात आणण्यासाठी मुंबई इंडियन्सने आपल्या सर्वात महागड्या खेळाडूला सोडलं आहे. मुंबई इंंडियन्ससने कॅमेरुन ग्रीनला १७.५ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. मात्र आता त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसोबत ट्रेड करण्यात आलं आहे. आगामी हंगामात तो रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघाकडून खेळताना दिसणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Samantha Prabhu: 'मला आई व्हायचंय...' घटस्फोटाच्या ३ वर्षांनंतर अभिनेत्रीची मातृत्वाची इच्छा

Maharashtra Election : कोणत्या जिल्ह्यात किती उमेदवार, महिला उमेदवाराची संख्या सर्वाधिक कुठे?

Viral Video: अबब! जेवणाचा थाट पाहून डोळे विस्फारतील, दक्षिण भारतातील व्हिडीओ व्हायरल

Maharashtra News Live Updates : कोल्हापुरात आतापर्यंत २० कोटींचा मुद्देमाल जप्त, 24 हजार संशयितांवर कारवाई

Pune Politics: शरद पवारांचा मास्टर स्ट्रोक, मतदानापूर्वी पुण्यातील टिंगरे, तुपे आणि धनकवडेंच्या हाती 'तुतारी'

SCROLL FOR NEXT