Prabhsimran Singh
Prabhsimran Singh saam tv
क्रीडा | IPL

Who is Prabhsimran Singh: बोली लाखांची मात्र खेळी कोटींची! पंजाबकडून खणखणीत शतक ठोकणारा प्रभसिमरन सिंग आहे तरी कोण?

Ankush Dhavre

DC VS PBKS IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील ५९ वा सामना दिल्ली कॅपिटल्स विरुध्द पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने जोरदार कामगिरी करत दिल्ली कॅपिटल्स संघावर ३१ धावांनी विजय मिळवला. या विजयासह पंजाब किंग्ज संघाने प्लेऑफमध्ये जाण्याच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत.

पंजाबला विजय मिळवून देण्यात प्रभसिमरन सिंगने मोलाचे योगदान दिले. या २२ वर्षीय फलंदाजाने दिल्ली विरुद्ध खेळताना आपल्या कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले आहे.

शतक झळकावण्यापूर्वी प्रभसिमरन सिंग कोण आहे हे अनेकांना माहितही नसावं. मात्र आता त्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केली आहे.

प्रभसिमरन सिंगने दिल्ली विरुध्द झालेल्या सामन्यात ६५ चेंडूंचा सामना करत १०३ धावांची खेळी केली. या खेळीनंतर त्याला आयपीएल स्पर्धेत किती लाखांची बोली लावून संघात स्थान दिलं गेलं आहे ? हा प्रश्न उसंडी घेऊ लागला आहे.

मात्र तुम्हाला जाणून आश्चर्य होईल की, शतकवीर प्रभसिमरन सिंगला पंजाब किंग्जने केवळ ६० लाखांची बोलून लावून आपल्या ताफ्यात समाविष्ट केलं आहे. मात्र त्याची फलंदाजी पाहून असं वाटतंय की, यापुढे त्याची किंमत वाढू शकते.

प्रभसिमरन सिंगच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद..

प्रभसिमरन सिंगने शतक झळकावताच त्याच्या नावे एका खास विक्रमाची नोंद झाली आहे. प्रभसिमरन सिंग हा आयपीएल स्पर्धेत शतक झळकावणारा ६ वा युवा फलंदाज ठरला आहे. सध्या त्याचं वय २२ वर्षे २७६ दिवस इतके आहे. आयपीएल स्पर्धेत सर्वात कमी वयात शतक झळकावणाऱ्या खेळाडूंबद्दल बोलायचं झालं तर, अव्वल स्थानी मनीष पांडे आहे. त्याने वय १९ वर्ष २७६ दिवस इतके असताना शतक झळकावले होते. नुकताच यशस्वी जयस्वालने देखील खणखणीत शतक झळकावले आहे. तो चौथा सर्वात युवा फलंदाज ठरला आहे. (Latest sports updates)

पंजाबसाठी अतिशय महत्वाचा सामना...

हा सामना पंजाब किंग्ज संघासाठी अतिशय महत्वाचा होता. जर या सामन्यात पंजाबचा संघ पराभूत झाला असता तर या स्पर्धेतून बाहेर झाला असता. दिल्ली कॅपिटल्स संघाने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता.

पंजाब किंग्ज संघाने प्रथम फलंदाजी करताना ७ गडी बाद १६७ धावा केल्या होत्या. हे आव्हान इतकं मोठं नव्हतं. दिल्लीला चांगली सुरुवातही मिळाली होती.

मात्र एकापाठोपाठ एक विकेट्स गमावल्यामुळे दिल्लीला सामना गमवावा लागला. पंजाबने या सामन्यात ३१ धावांनी विजय मिळवला. यासह दिल्लीचा संघ स्पर्धेतून बाहेर झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Madha Lok Sabha: माढ्यात शरद पवार गटाला मोठा धक्का बसणार? बडा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

Ranbir - Sai Photos Viral Ramayana Movie : ‘रामायण’ चित्रपटाच्या सेटवरील रणबीर कपूर आणि साई पल्लवीचा फोटो व्हायरल, लूक पाहून नेटकरी म्हणाले...

Shirur Lok Sabha: शिरूरमध्ये प्रचारावरून वातावरण तापलं; अमोल कोल्हेंचा हल्ला, तर आढळरावांचा प्रतिहल्ला

Hardik Pandya Angry: हार्दिक पंड्या लाईव्ह सामन्यात अंपायरवर भडकला! नेमकं काय घडलं?

Manoj Jarange Patil: सहानुभूतीसाठी कटकारस्थान... प्रकाश शेंडगेंच्या आरोपांवर मनोज जरांगेंचा पलटवार

SCROLL FOR NEXT