Gautami Patil
Gautami Patil  Saam TV
क्रीडा | IPL

Gautami Patil Latest News : लाखो दिलों की धडकन... गौतमी पाटीलचा आवडता क्रिकेटपटू कोण?

Ankush Dhavre

Gautami Patil Favourite Cricketer: सध्या महाराष्ट्रात एक नाव जोरदार चर्चेत आहे. ते म्हणजे सबसे कातिल गौतमी पाटील. गावागावात आणि मोठ मोठ्या शहरांमध्ये तिच्या कार्यक्रमांना तुफान गर्दी होत असते.

चाहते तिची एक झलक पाहण्यासाठी वाट पाहत असतात. ती काही ना काही कारणांमुळे चर्चेत येत असते. आता ती डान्स आणि कार्यक्रमाच्या पलीकडे एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे.

महाराष्ट्रात राजकीय कार्यक्रम, बैलाचा वाढदिवस, लग्नाचा वाढदिवस असला की, गौतमी पाटीलचा कार्यक्रम असतोच. गौतमी पाटीलचा क्रेझ इतका वाढला आहे की, तिच्या फॅन्सला तिच्याबद्दल एकूण एक गोष्ट जाणून घ्यायची असते. आयपीएलचा सिझन सुरु असताना, गौतमी पाटीलने आपल्या आवडत्या क्रिकेटपटूबद्दल खुलासा केला आहे.

तिला एका मुलाखतीदरम्यान मुंबई इंडियन्स की चेन्नई सुपर किंग्ज असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावेळी तिने मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) असं उत्तर दिलं आहे. तर आवडता क्रिकेटपटू कोणता? असा प्रश्न विचारला असता तिने क्षणाचा ही विलंब न करता एमएस धोनी (MS Dhoni)असं सांगितलं. (Latest sports updates)

गौतमी पाटीलचा क्रेझ हा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. सुरुवातीला खूप कमी लोकांना गौतम पाटील कोण आहे हे माहीत होतं. मात्र सोशल मीडियामुळे ती आता घराघरात पोहोचली आहे. ती आता एका कार्यक्रमाचे २-३ लाख रुपये घेते.

आता महिला देखील गौतमी पाटीलचे कार्यक्रम आयोजित करत आहेत. महिला दिनानिमित्तानं पुण्यात गौतमीचा सत्कार देखील करण्यात आला होता.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंमुळेच गेली 1999मध्ये युतीची सत्ता, देवेंद्र फडणवीस यांचा गंभीर आरोप

Sushma Andhare : 'लाव रे तो व्हिडिओवर' सुषमा अंधारेंची तिखट प्रतिक्रिया; बाळासाहेबांचं नाव घेत राज ठाकरेंना सुनावलं

Horoscope: 1 वर्षानंतर सूर्य होणार शुक्राच्या राशीत विराजमान, 3 राशींचा होणार फायदा; या 2 राशींचे लोक राहा सावध

PoK तापलं; आंदोलनकर्ते आणि पोलीस कर्मचारी आमनेसामने; एका अधिकाऱ्याचा मृत्यू, १०० जण जखमी

RCB vs DC: बेंगळुरूचा 'चॅम्पियन' गेम; पॉईंट्स टेबलमध्ये घेतली भरारी

SCROLL FOR NEXT