Who is Sourabh Kumar x BCCI
Sports

Who is Sourabh Kumar: जडेजाच्या जागी टीम इंडियात पदार्पण करणारा सौरभ कुमार आहे तरी कोण?

IND vs ENG Test : भारतीय संघात सौरभ कुमारला संधी मिळालीय. रवींद्र जडेजाच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. २८ वर्षीय सौरभ कुमार हा स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. सौरभ हा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याची सर्वात मोठी ताकद त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी आहे.

Bharat Jadhav

Who is Sourabh Kumar:

सध्या सुरू असलेल्या भारत आणि इंग्लंडच्या संघामधील कसोटी मालिकेतील पहिला सामना टीम इंडियाने गमावला. भारताने कसोटीच्या पहिल्या दोन दिवसांवर वर्चस्व गाजवले होते. पण दुसऱ्या डावात ओली पोपच्या धमाकेदार फलंदाजीने भारतीयांची झोप उडवली. पोपने १९६ धावा केल्या तर चौथ्या डावात हार्टलीचे ७ बळी घेतले यामुळे भारताचा पराभव झाला. परंतु यानंतर भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. (Latest News)

सौरभ कुमारसह सर्फराज खान, वॉशिंग्टन सुंदर यांना टीम इंडियामध्ये जागा मिळालीय. या तिघांना भारताच्या संघात सामील करुन घेत असल्याची घोषणा बीसीसीआयने केली. दरम्यान या तिघांपैकी आपण तिसरा भिडू नव्या दमाचा क्रिकेटपटू सौरभ कुमारबद्दल अधिकची माहिती जाणून घेऊ..

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

कोण आहे सौरभ कुमार?

भारतीय संघात सौरभ कुमारला संधी मिळालीय. रवींद्र जाडेजाच्या जागी त्याला संघात स्थान देण्यात आलं आहे. २८ वर्षीय सौरभ कुमार हा स्थानिक क्रिकेटमध्ये उत्तर प्रदेशचे प्रतिनिधित्व करतो. सौरभ हा एक अष्टपैलू खेळाडू असून त्याची सर्वात मोठी ताकद त्याची डावखुरी फिरकी गोलंदाजी आहे. सौरभ मूळचा उत्तर प्रदेशातील बागपतचा आहे. त्याचे कुटुंब मेरठमध्ये राहते.

सौरभ वयाच्या १६व्या वर्षापासून क्रिकेट खेळत आहे. २०१४ मध्ये त्याने सर्व्हिसेसच्या संघाकडून रणजी क्रिकेट खेळला. त्यानंतर २०१५ पासून तो उत्तर प्रदेशच्या संघाचा भाग बनला. सौरभ कुमारने आतापर्यंतच्या कारकिर्दीत ४६ प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. त्यात १,५७२ धावा आणि १९६ बळी घेतले आहेत. ४६ सामन्यात त्याने १६ वेळा एका डावात पाच बळी घेतले आहेत. तर सहा वेळा एका सामन्यात १० किंवा त्याहून अधिक बळी घेतले आहेत.

सौरभची एका डावातील सर्वोत्तम कामगिरी ३२ धावांत ७ बळी अशी आहे. तर सामन्यातील सर्वोत्तम कामगिरी ६५ धावांत १४ बळी घेण अशी आहे. सौरभने २ शतके आणि ८ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोच्च धावसंख्या १३३ धावा आहे. इतकेच नाही तर सौरभ कुमारला २०१७ साली पुणे सुपर जायंट्स संघाने १० लाखाला विकत घेतले होते, तर २०२१ साली पंजाब किंग्सने २० लाखाच्या किमतीत त्याला संघात दाखल करून घेतले होते. दरम्यान सौरभचे वडील ऑल इंडिया रेडिओमध्ये कार्यरत होते. त्याची आई गृहिणी आहे. सौरभ कुमारने २०२१ मध्ये नेहा साबी हिच्याशी लग्न केलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सरकारी नोकरी करत दिली UPSC; पाचव्या प्रयत्नात झाल्या IPS; मोहिता शर्मा यांचा प्रेरणादायी प्रवास

Pune : पुण्यात पुन्हा गोळीबाराचा थरार, रात्री ११ वाजता मावळ हादरलं, नेमकं काय घडलं?

Chhagan bhujbal : जीआरमध्ये मराठा जातीचा उल्लेख, निर्णय मागे घ्या; छगन भुजबळ आक्रमक

Palghar News: संपानं घेतला चिमुकलीचा जीव; उपचाराअभावी २ वर्षीय मुलीचा मृत्यू,शासकीय रुग्णालयातील धक्कादायक प्रकार

Raj Thackeray : राज ठाकरे महाविकास आघाडीत येणार? महाराष्ट्रात राजकीय हालचालींना वेग, मातोश्रीच्या बैठकीत काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT