virat kohli saam tv news
Sports

Virat Kohli Retirement Prediction: विराटच्या निवृत्तीबाबत मोठी भविष्यवाणी! आतापर्यंत केलेले सर्व दावे ठरलेत खरे; पोस्ट व्हायरल

Virat Kohli Retirement: विराट कोहली केव्हा निवृत्त होणार याबाबत दावा करण्यात आला आहे. ज्याची एक पोस्ट सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Retirement Prediction:

सोशल मीडियावर एक पोस्ट जोरदार व्हायरल होत आहे. ज्यात विराट कोहलीच्या कारकिर्दीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्याबद्दल भविष्यवाणी केली गेली होती. मुख्य बाब म्हणजे जे जे लिहीलं होतं ते सर्व खरं ठरल्याचं दिसून आलं आहे.

या पोस्टनूसार, विराट कोहली २०१६,२०१७ आणि २०१८ मध्ये कारकिर्दीच्या शिखरावर जाणार होता आणि असंच झालं. यादरम्यान तो भारतीय संघाचा कर्णधार झाला आणि २०१७-१८ मध्ये त्याने धावांचा पाऊस पाडला. (Virat Kohli Prediction)

लग्नाबाबत केलेली भविष्यवाणी खरी ठरली..

या पोस्टमध्ये असा दावा केला गेला होता की, विराट २०१७ च्या शेवटी किंवा २०१८ च्या सुरुवातीली विवाह बंधनात अडकेल. हा दावाही खरा निघाला. विराट डिसेंबर २०१७ मध्ये विवाह बंधनात अडकला. त्यानंतर जानेवारी २०२१ मध्ये त्याला कन्यारत्न प्राप्ती झाली.

विराटच्या कारकिर्दीबाबत मोठी भविष्यवाणी करण्यात आली होती. असा दावा करण्यात आला होता की, सप्टेंबर २०२० ते सप्टेंबर २०२१ या कालावधीत विराटला धावा करताना संघर्ष करावा लागेल. ही भविष्यवाणीही खरी ठरली.

विराटला या कालावधीत एकही शतक झळकावता आलं नाही. त्यानंतर २०२१ ते २०२५ या कालावधीत विराट धावांचा पाऊस पाडेल,असं म्हटलं गेलं होतं आणि झालं ही असंच. सध्या विराट तुफान फॉर्ममध्ये आहे. भारतीय संघाला वर्ल्डकप जिंकता आला नसला तरीदेखील विराटने सर्वाधिक धावा करत प्लेअर ऑफ द टूर्नामेंटचा पुरस्कार पटकावला आहे. (Latest sports updates)

विराट केव्हा निवृत्त होणार?

या भविष्यवाणीत असा दावा करण्यात आला आहे की, २०२५ ते २०२७ हा विराटच्या क्रिकेट कारकिर्दीतील वाईट काळ असेल. २०२७ या कालावधीत तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करु शकतो.

साम टीव्हीने या पोस्टची सत्यता पडताळली नसून आम्ही याची पुष्टी करत नाही.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shaktipeeth Expressway :'शक्तीपीठ' ठरणार पांढराहत्ती? शेतकऱ्यांचं नुकसान, शेकडो गावांना फटका बसणार; राजू शेट्टींनी सांगितले विकासाचे अडथळे

Satara News: थरारक! साताऱ्यातील खंबाटकी घाटात ट्रकचा जळून कोळसा; वाहतूक ठप्प, VIDEO

IMD Rain Alert : महाराष्ट्रातील कोकण, विदर्भ, मराठवाडासह देशभरात ७ दिवस मुसळधार पावसाचा इशारा

Hindi Language Controversy: मला मराठी येत नाही, ताकद असेल तर महाराष्ट्रातून हाकलून द्या; केडियानंतर राज ठाकरेंना अभिनेत्याचं ओपन चॅलेंज

Maharashtra Politics : राज ठाकरे संपूर्ण भाषणात कुठेही 'ते' वाक्य बोलले नाही; एकनाथ शिंदेंच्या बड्या नेत्याचा थेट मुद्द्याला हात

SCROLL FOR NEXT