IND VS ENG Cricket Match Twitter
Sports

IND vs ENG, Live Streaming: जियो, हॉटस्टार नव्हे, इकडे फुकटात पाहा भारत- इंग्लंड मालिका

India vs England Live Streaming Details: भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. दरम्यान ही मालिका फुकटात कुठे पाहता येणार?

Ankush Dhavre

भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेला २२ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. मालिकेतील पहिला सामना कोलकातातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.

या मालिकेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. दोन्ही संघांमध्ये एकापेक्षा एक बलाढ्य खेळाडू आहेत. दरम्यान या मालिकेचा थरार लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

केव्हा सुरु होणार भारत- इंग्लंड पहिला टी-२० सामना?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना २२ जानेवारीला खेळला जाणार आहे.

भारत आणि इंग्लंड यांच्यातील पहिला सामना कुठल्या मैदानावर खेळवला जाईल?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिकेतील पहिला सामना कोलकात्यातील ईडन गार्डन्सच्या मैदानावर रंगणार आहे.

भारत - इंग्लंड मालिका लाईव्ह कुठे पाहता येणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यातील टी-२० मालिका तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाईव्ह पाहू शकता.

भारत - इंग्लंड टी-२० मालिकेचे लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहता येणार?

भारत आणि इंग्लंड यांच्यात होणारी टी-२० मालिका तुम्हाला डिज्नी प्लस हॉटस्टारवर लाईव्ह पाहता येईल. ही मालिका तुम्हाला फ्री मध्ये पाहता येणार नाही. त्यामुळे जर तुम्हाला ही मालिका हॉटस्टावर लाईव्ह पाहायची आहे. तर तुम्हाला सब्स्किप्शन घ्यावं लागेल. तर हा सामना तुम्ही डीडी स्पोर्ट्सवर फुकटात पाहू शकता.

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११:

भारत: संजू सॅमसन, अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), रिंकू सिंग, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल (उप कर्णधार), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती.

इंग्लंड: फिल सॉल्ट, बेन डकेट, जोस बटलर (कर्णधार), हॅरी ब्रूक, जेकब बेथेल, लियाम लिविंगस्टन, जेमी ओवरटन, गस एटकिंसन, आदिल राशिद, जोफ्रा आर्चर, मार्क वुड.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: मोठी बातमी! संभाजीनगरमध्ये २३ नगरसेवक अपात्र ठरणार? प्रशासनाकडून नोटीस जारी; कारण काय?

Maharashtra News Live: नाशिक शहरात सकाळपासून पावसाने घेतली विश्रांती

Lung Cancer Stage 1: फुफ्फुसांच्या कॅन्सरच्या स्टेज 1 मध्ये ही 5 लक्षणं दिसून येतात; शरीर देत असलेले संकेत वेळीच ओळखा

School Closed : शाळा - महाविद्यालयांना सुट्टी जाहीर, नाशिक जिल्हा प्रशासनाचा निर्णय

Mumbai Tourism : वीकेंडला जोडीदारासोबत निवांत वेळ घालवा, 'ही' आहेत मुंबईतील रोमँटिक अन् सुंदर ठिकाणे

SCROLL FOR NEXT