what is rcb vs csk match washed out who will get the playoffs ticket know the scenario amd2000 twitter
Sports

RCB vs CSK सामन्यावर ऑरेंज अलर्टचं संकट! सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?

CSK vs RCB Playoffs Scenario: चेन्नई सुपर किंग्ज आणि ऋतुराज गायकवाड या दोन्ही संघांमध्ये होणाऱ्या सामन्यावर पावसाचं संकट आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील ६८ वा सामना अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ चेन्नई सुपर किंग्ज संघाचा सामना करताना दिसून येणार आहे. हा सामना प्लेऑफमध्ये जाण्याच्या दृष्टीने दोन्ही संघांसाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. या सामन्यापूर्वी दोन्ही संघांचं टेन्शन वाढवणारी बातमी समोर आली आहे. या सामन्यात पाऊस पडणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दरम्यान हा सामना रद्द झाल्यास प्लेऑफचं तिकीट कोणाला मिळणार? कसं असेल समीकरण? जाणून घ्या.

हवामान खात्याने १८-२० मे दरम्यान बंगळुरूत ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. यानुसार अतीमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. AccuWeather ने दिलेल्या अंदाजानुसार, १८ मे रोजी बंगळुरूत पाऊस पडण्याची शक्यता ही ७० ते ८० टक्के इतकी असणार आहे.

सामना रद्द झाल्यास कोणाला मिळणार प्लेऑफचं तिकीट?

हा सामना रद्द झाला, तर दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. त्यामुळे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचास संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडेल. तर चेन्नई सुपर किंग्जचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरेल. चेन्नई सुपर किंग्जचा संघ सध्या १४ गुणांसह चौथ्या स्थानी आहे. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १२ गुणांसह सहाव्या स्थानी आहे. सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना प्रत्येकी १-१ गुण दिला जाईल. असे झाल्यास चेन्नई सुपर किंग्जचे १५ गुण होतील. तर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ १३ गुणांपर्यंत पोहचेल. हे गुण प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी पुरेसे नसतील.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील प्लेऑफच्या सामन्यांना २१ मे पासून सुरुवात होणार आहे. क्वालिफायर १ चा सामना २१ मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगणार आहे. तर २२ मे रोजी एलिमिनेटर आणि २४ मे रोजी एलिमिनेटर २ चा सामना रंगणार आहे. तर स्पर्धेतील फायनलचा सामना २६ मे रोजी चेन्नईमध्ये रंगणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

Shocking : तरुणीच्या प्रायव्हेट पार्टमध्ये प्लास्टिक बॉटल अडकली; क्षणिक सुखासाठी नको ते करुन बसली, डॉक्टरही चक्रावले

५ जुलैला महाविनाश? नवीन बाबा वेंगाच्या भविष्यवाणीचा धसका, महाप्रलयाला एक दिवस बाकी?

Operation Sindoor: पाक आणि चीनची डोकेदुखी वाढणार,अपाचे हेलिकॉप्टर, ठरणार शत्रूचा कर्दनकाळ, अमेरिका भारताला देणार 'AH-64E हेलिकॉप्टर'

सरकार देणार तुम्हाला मोफत फ्लॅट? अर्ज करण्यासाठी सरकारची नवी वेबसाईट? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

SCROLL FOR NEXT