GT VS MI, IPL 2023 saam tv
Sports

GT vs MI Weather Report: GT vs MI सामना पावसामुळे रद्द झाल्यास कोण जाणार फायनलमध्ये?

GT vs MI Eliminator 2: आयपीएल २०२३ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

GT vs MI, IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील क्वालिफायर २ चा सामना आज गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. या सामन्यात हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली खेळणारा गुजरात टायटन्स आणि रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणारा मुंबई इंडियन्स संघ आमने सामने येणार आहे. हा सामना संध्याकाळी ७:३० वाजता अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडिअमवर रंगणार आहे.

या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम फेरीत प्रवेश करणार आहे. अंतिम फेरीत विजेत्या संघाचा सामना चेन्नई सुपर किंग्ज संघासोबत होणार आहे. क्वालिफायर १ च्या सामन्यात गुजरात टायटन्स संघाला चेन्नई सुपर किंग्ज संघाकडून पराभवाचा सामना करावा लागला होता.

आता हा संघ क्वालिफायर २ चा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तर दुसरीकडे एलिमिनेटरच्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने लखनऊ सुपर जायंट्स संघाचा ८१ धावांनी धुव्वा उडवला होता.

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात पाऊस पडल्यास कोण जाणार फायनलमध्ये?

गुजरात टायटन्स विरुद्ध मुंबई इंडियन्स यांच्यातील सामन्यात पाऊस आला किंवा सामना रद्द झाल्यास गुजरातला फायदा होईल. असे झाल्यास गुजरातचा संघ अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल. गुजरातचा संघ पॉईंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानी होता. या संघाने १४ पैकी १० सामने जिंकले होते.

गुजरातचा नेट रन रेट ०.८०९ इतका आहे. तर मुंबईने १६ गुणांसह प्लेऑफमध्ये प्रवेश केला होता. हे पाहता गुजरातचा संघ प्लेऑफसाठी पात्र ठरणार आहे. आयपीएल स्पर्धेत रिझर्व्ह डे नसतो. त्यामुळे अशा पद्धतीने निर्णय घेतला जाईल. (Latest sports updates)

असे असेल आजचे वातावरण..

हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, आज पाऊस पडण्याची शक्यता नाहीच्या बरोबर आहे. त्यामुळे चाहत्यांना रोमांचक सामना पाहायला मिळू शकतो.

अशी असु शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11:

मुंबई इंडियन्स: इशान किशन (विकेटकीपर), रोहित शर्मा (कर्णधार), कॅमेरॉन ग्रीन, सूर्यकुमार यादव, टिम डेव्हिड, नेहल वढेरा, तिलक वर्मा, पियुष चावला, आकाश मधवाल, कुमार कार्तिकेय, ख्रिस जॉर्डन.

गुजरात टायटन्स : शुभमन गिल, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), हार्दिक पंड्या (कर्णधार), विजय शंकर, डेव्हिड मिलर, अभिनव मनोहर/दासून शनाका, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, मोहित शर्मा, मोहम्मद शमी.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Garlic Benefits: सकाळी रिकाम्या पोटी 1 लसणाची पाकळी खाल्ल्यावर हार्ट अटॅक ते डायबेटीजचा धोका टळतो, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला

Shocking: हे बाळ आमच्या मुलाचं नाही..., सासू-सासऱ्यांकडून चारित्र्यावर संशय; सुनेने ९ महिन्यांच्या मुलीला संपवलं

Maharashtra Live News Update: पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ, रेस्टॉरंटवर टाकला दरोडा

Black Coffee vs Milk Coffee: ब्लॅक कॉफी की मिल्क कॉफी, कोणती अधिक फायदेशीर?

CET Exam Update : विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! CET परीक्षा वर्षातून ३ वेळा होणार, जाणून घ्या संपूर्ण माहिती

SCROLL FOR NEXT