ind vs wi saam tv
Sports

IND vs WI ODI Series: वनडे मालिकेसाठी संघाची घोषणा! निवडकर्त्यांनी 'या' 15 खेळाडूंना दिलं स्थान

West Indies Squad For ODI Series: आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. येत्या २७ जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

Ankush Dhavre

West Indies vs India ODI Series: नुकताच भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका पार पडली. ही मालिका झाल्यानंतर आता दोन्ही संघ ३ वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी आमने सामने येणार आहेत. येत्या २७ जुलैपासून या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

मालिकेतील पहिला वनडे सामना बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे. या मालिकेसाठी वेस्टइंडीजच्या १५ सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

वनडे मालिकेसाठी वेस्टइंडीज संघाची घोषणा..

वेस्टइंडीज संघाने भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे.या संघात शिमरॉन हेटमायरला स्थान देण्यात आले आहे. तो दोन वर्षांनंतर वेस्टइंडीज संघासाठी वनडे सामना खेळण्यासाठी मैदानावर खेळण्यासाठी उतरणार आहे.

तसेच या संघात वेगवान गोलंदाज ओशेन थॉमसला देखील संघात कमबॅक करण्याची संधी देण्यात आली आहे. तर वेगवान गोलंदाज जेडन सिल्स,फिरकी गोलंदाज यानिक कारीया आणि फिरकी गोलंदाज गुडाकेश मोतीला देखील संघात स्थान दिले गेले आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाविरूद्ध होणाऱ्या वनडे मालिकेसाठी असा आहे १५ सदस्यीय संघ:

शाई होप (कर्णधार), रोमन पॉवेल (उपकर्णधार), एलिक एथनाज, यानिक कारिया, कीसी कार्टी, डोमिनिक ड्रेक्स, शिमरॉन हेटमायर, अल्जारी जोसेफ, ब्रँडन किंग, काइल मेयर्स, गुडाकेश मोती, जेडन सील्स, रोमारियो शेफर्ड, केविन सिंक्लेयर आणि ओशाने थॉमस.

असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, रूतुराज गायकवाड़, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), ईशान किशन (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या (उपकर्णधार), शार्दुल ठाकुर, रविंद्र जड़ेजा, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, मुकेश कुमार.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं भाषण सुरू, मंचावर भाजप नेत्याच्या डुलक्या; व्हिडिओ व्हायरल

Narali Purnima 2025: यंदा नारळी पौर्णिमा कधी आहे?

Electric Shock : मोटार सुरु करताना विजेच्या धक्क्याने महिलेचा मृत्यू; माहेरच्यांचा मात्र घातपाताचा आरोप

Maharashtra Live News Update : रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावरील वाहतूक 15 तासानंतर सुरू

Oli Bhel Recipe: चौपाटीवर मिळणारी चटपटीत ओली भेळ, वाचा सीक्रेट रेसिपी

SCROLL FOR NEXT