ind vs wi saam tv
क्रीडा

IND vs WI 1st Test: पहिल्या कसोटीसाठी संघाची घोषणा! विस्फोटक खेळाडूचं संघात कमबॅक

Ankush Dhavre

West Indies Squad For WI vs IND 1st Test: भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका रंगणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघ सज्ज झाले आहेत. मालिकेतील पहिला सामना १२ जुलैपासून डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी वेस्ट इंडिजने १३ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. या संघाची जबाबदारी क्रेग ब्रेथवेटकडे सोपवण्यात आली आहे. तर रहकिम कॉर्नवॉल २०२१ नंतर कमबॅक करताना दिसून येणार आहे. (West indies Squad)

वेस्ट इंडिजचा संघ नुकताच वर्ल्डकप पात्रता फेरीतील सामने खेळून परतला आहे. या स्पर्धेत वेस्टइंडिजला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या स्पर्धेत वेस्ट इंडिजचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जेसन होल्डर आणि अल्झारी जोसेफला देखील संघात स्थान दिलं गेलं आहे. यासह किर्क मॅकेन्झी आणि एलिक एथानाजेला देखील संघात स्थान दिलं गेलं आहे.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी असा आहे वेस्ट इंडिजचा संघ:

क्रेग ब्रॅथवेट (कर्णधार), जर्मेन ब्लॅकवुड (उपकर्णधार), अलिक अथानाज, तेजनारिन चंदरपॉल, रहकीम कॉर्नवॉल, जोशुआ डी सिल्वा, शॅनन गॅब्रिएल, जेसन होल्डर, अल्झारी जोसेफ, किर्क मॅकेन्झी, रेमन रेफर, केमार रोच, जोमेल वॉरिकन.

वेस्ट इंडिजविरूद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेसाठी असा आहे भारतीय संघ:

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, ऋतुराज गायकवाड़, विराट कोहली, यशस्वी जयसवाल, अजिंक्य रहाणे (कर्णधार), केएस भरत (विकेटकीपर), ईशान किशन (यष्टिरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जड़ेजा, शार्दुल ठाकुर, अक्षर पटेल, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जयदेव उनादकट, नवदीप सैनी. (Latest sports updates)

भारतीय संघ डॉमिनिकाला रवाना...

भारत आणि वेस्ट इंडिज या दोन्ही संघांमध्ये पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघाचा सराव बार्बाडोसमध्ये सुरू होता. इथेच भारतीय संघाचा सराव सामना पार पडला. आता वेस्ट इंडिजसोबत दोन हात करण्यासाठी भारतीय संघ डॉमिनिकाला रवाना झाला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: डॉक्टर्स ब्रेन ट्यमूर काढत होते, महिला रुग्ण बघत होती ज्युनियर NTR चा सिनेमा, ऑपरेशन थिएटरमधील व्हिडीओ व्हायरल

Urvashi Rautela : उर्वशी रौतेलाने ऋषभ पंतसोबत डेटिंगच्या अफवांवर सौडलं मौन, सांगितला खरा RP कोण?

Subhadra Yojana: महिलांना मिळणार १०,००० रुपये; काय आहे सुभद्रा योजना?

Maharashtra News Live Updates: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील वाद चव्हाट्यावर

iPhone 16 Sale Video : iPhone 16 च्या खरेदीसाठी अॅपल स्टोअर बाहेर झुंबड; बघा Video

SCROLL FOR NEXT