accident twitter
Sports

Cricketer Accident: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूचा भीषण अपघात! कारचा झालाय चुराडा

Nkrumah Bonner Car Accident News: वेस्टइंडीजच्या स्टार खेळाडूच्या कारचा अपघात झाला आहे.

Ankush Dhavre

Nkrumah Bonner News In Marathi: कुठलाही क्रिकेट फॅन ३० डिसेंबर ही तारीख कधीच विसरु शकणार नाही. भारताचा स्टार यष्टीरक्षक फलंदाज नवीन वर्षाचं सेलिब्रेशन करण्यासाठी आपल्या घरी जात होता. त्यावेळी त्याचा कारचा भीषण अपघात झाला होता.

या अपघातात तो गंभीर दुखापतग्रस्त झाला होता. या अपघातानंतर काही महिने तो रुग्णालयातच होता. मात्र हा अपघात पाहिला, तरी अंगावर काटा येतो. आता आणखी एका क्रिकेटपटूसह अशीच काहीशी घटना घडली आहे.

वेस्टइंडीजचा क्रिकेटपटू एनक्रुमाह बोन्नेरचा १८ नोव्हेंबरला भारतीय वेळेनुसार मध्यरात्री २ वाजता भीषण अपघात झाला. त्याने सोशल मीडियावर स्टोरी पोस्ट करत याबाबत माहिती दिली. स्टोरीमध्ये शेअर केलेल्या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता की, कारचा चुराडा झाला आहे. मात्र दिलासा देणारी बाब अशी की, भीषण अपघात होऊनही तो सुखरुप आहे.

२०११ मध्ये केलं होतं पदार्पण

एनक्रुमाह बोन्नेरला २०११ मध्ये वेस्टइंडीजसाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली होती. मधल्या फळीत फलंदाजी करण्यासह तो लेग स्पिन गोलंदाजीही करायचा. त्याला सुरुवातीला संधी मिळाली. मात्र त्याला मिळालेल्या संधीचं सोनं करता आलं नाही.

त्यामुळे त्याला संघातील स्थान गमवावं लागलं. त्यानंतर देशांतर्गत क्रिकेटमध्ये त्याने दमदार कामगिरी केली आणि २०२० मध्ये वेस्टइंडीजच्या कसोटी संघातून कमबॅक केलं.

एनक्रुमाह बोन्नेरच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं, तर त्याने वेस्टइंडीजकडून कसोटी क्रिकेट खेळताना, १५ कसोटी सामन्यांमध्ये ८०३ धावा केल्या. या धावा त्याने ३८.२३ च्या सरासरीने केल्या. बांगलादेशविरुद्ध झालेल्या कसोटीत ८६ धावांची खेळी करुन तो चर्चेत आला होता. त्याने काईल जेमिसनसोबत मिळून महत्वपूर्ण भागीदारी केली होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यात 2 पूरबळी; यवतमाळ जिल्ह्याला पावसाने झोडपलं

'पप्पा मला अ‍ॅडमिशन घेऊन द्या ना'; पैशांअभावी वडिलांचा थांबण्याचा सल्ला; घरी कुणी नसताना लेकीनं आयुष्य संपवलं

Nashik News: नाशिकमध्ये धो धो! गोदामातेची पुरातच आरती, भक्तांची मांदियाळी|VIDEO

Skin Care Tips: पावसाळ्यात ग्लोइंग त्वचा हवीये, मग फॉलो करा 'या' सिंपल टिप्स

Shubman Gill : शुभमन गिलकडून झाली मोठी चूक! भारताच्या कॅप्टनचा 'तो' व्हिडीओ लीक, बीसीसीआयला फटका बसणार?

SCROLL FOR NEXT