Jason Holder Saam TV
Sports

WI vs ENG: जेसन होल्डरने रचला इतिहास, असे करणारा विंडीजचा पहिलाच गोलंदाज

Jesan Holder Hat-Trick Video: T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 27 हॅटट्रिक्स घेण्यात आलेल्या आहेत आणि होल्डर हा जगातील 26 वा गोलंदाज आहे ज्याने ही कामगिरी केली आहे.

वृत्तसंस्था

सध्या जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत समाविष्ट असलेल्या वेस्ट इंडिजच्या जेसन होल्डरने रविवारी एक अनोखा विक्रम आपल्या नावावर केला आहे. होल्डरने बार्बाडोस येथे इंग्लंड विरुद्ध (WI vs Eng) T-20 सामन्यात शानदार हॅटट्रिक (Jesan Holder Hat-Trick) घेतली. यासह, टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये हॅट्ट्रिक घेणारा तो वेस्ट इंडिजचा पहिला गोलंदाज ठरला आहे. T-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत 27 हॅटट्रिक्स घेण्यात आलेल्या आहेत आणि होल्डर हा जगातील 26 वा गोलंदाज आहे ज्याने ही कामगिरी केली आहे. दोनदा विकेट हॅट्ट्रिक घेणारा श्रीलंकेचा लसिथ मलिंगा हा एकमेव गोलंदाज आहे. (Jesan Holder Hat-Trick WI Vs Eng)

मालिकावीर म्हणूनही सन्मान...

वेस्ट इंडिज आणि इंग्लंड यांच्यात रविवारी पाच सामन्यांच्या T20 मालिकेतील निर्णायक सामना खेळला गेला. या सामन्यात होल्डरच्या घातक गोलंदाजीमुळे वेस्ट इंडिजने मालिका 3-2 अशी जिंकली आहे. अंतिम सामन्यात जेसन होल्डरने सलग 4 चेंडूवरती 4 बळी घेवून मालिका विंडीजच्या नावावर केली आहे. 30 वर्षीय कॅरेबियन गोलंदाजाने आपल्या कारकिर्दीतील ही सर्वोत्तम गोलंदाजी केली आहे. 4 षटकांच्या स्पेलमध्ये केवळ 27 धावा देत त्याने 5 महत्त्वपूर्ण विकेट घेतल्या आहेत. त्याने हॅट्ट्रिक करताना ख्रिस जॉर्डन, आदिल रशीद आणि शाकिब महमूदचे बळी घेतले. यासोबतच त्याने सॅम बिलिंग्ज आणि कर्णधार मोईन अलीलाही पॅव्हेलियनमध्ये पाठवले. 5 सामन्यात 15 विकेट घेणाऱ्या होल्डरला मालिकावीर म्हणूनही गौरविण्यात आले.

असे करणारा जगातील 4 गोलंदाज

20 व्या षटकात वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज होल्डरने दुसऱ्या ते 5 व्या चेंडूत 4 बळी घेत आपल्या संघाला 17 धावांनी विजय मिळवून दिला. यासह, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 4 चेंडूत 4 बळी घेणारा तो जगातील चौथा गोलंदाज ठरला आहे. होल्डरच्या आधी, अफगाणिस्तानचा लेग-स्पिनर राशिद खानने 2019 मध्ये डेहराडूनमध्ये आयर्लंडविरुद्ध हा पराक्रम केला होता. त्याच वेळी, श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाने 2019 मध्ये पल्लेकलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध ही कामगिरी केली होती, तर आयर्लंडच्या कर्टिस कॅम्परने 2021 मध्ये नेदरलँडविरुद्ध ही कामगिरी केली होती.

Edited By: Pravin Dhamale

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

संसदेच्या बाहेर राममंदिरातील 'चंदा चोरी', संसद आवारात अवतरले मंदिरातले साधू

Fact Check: समोसा, जिलेबीवरही आता वॉर्निंगचा स्टॅम्प? समोसा, जिलेबी सिगारेटएवढं धोकादायक?

GEN Z आंदोलकांवर गुन्हे, CJPमध्ये संताप, आंदोलकांवर कारवाईसाठी पोलीस सरसावले, सरकारच्या समर्थनात दिल्ली पोलीस कुटुंबीयांची उडी

पोलिसांची अजब कारवाई, पाटलांचं गजब विधान, 'दगडावरील आंदोलकांच्या बोटांचे ठसे आधारला जोडणार'

भिवंडीत 4 मजली इमारत कोसळली, 10 जणांचे मारेकरी कोण?

SCROLL FOR NEXT