jasprit bumrah twitter
Sports

Viral Cricket Video: मलिंगा- बुमराह फेल! मार्केटमध्ये आलीये नवीन गोलंदाजी Action; व्हिडिओ एकदा पाहाच

Viral Bowling Action: सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय, ज्यात एक गोलंदाज आगळ्या वेगळ्या स्टाईलने गोलंदाजी करताना दिसून येत आहे.

Ankush Dhavre

भारतात क्रिकेटची क्रेझ कुठल्या लेव्हलची आहे, हे वेगळ्याने सांगायची काहीच गरज नाही. भारतात क्रिकेटला केवळ खेळ नव्हे, तर धर्म मानले जाते. प्रत्येक खेळाडूला वाटतं की, त्याने एक दिवस भारतीय संघासाठी खेळावं.

मात्र प्रत्येकाचं हे स्वप्न पूर्ण होत नाही. प्रत्येक गल्लीत, प्रत्येक मैदानावर तुम्हाला क्रिकेट खेळणारे खेळाडू दिसून येतील. प्रत्येकाची गोलंदाजी करण्याची स्टाईल ही वेगळी असते. अशाच एका गोलंदाजाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय, ज्याची गोलंदाजी अॅक्शन पाहून तुम्हालाही आश्चर्य वाटेल.

या गोलंदाजासमोर बुमराह फेल

सोशल मीडियावर असंख्य व्हिडिओ व्हायरल होत असतात, असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत ठरतोय,ज्यात गोलंदाज हटके स्टाईलने गोलंदाजी करताना दिसून येतोय. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, गोलंदाजाने आधी आपला डावा हात फिरवला, त्यानंतर उजवा हात कंबरेच्या मागे घेऊन गेला आणि चेंडू टाकला.

फलंदाज रिव्हर्स स्विप मारण्यासाठी तयार होता. मात्र त्याची आगळी वेगळी गोलंदाजी फलंदाजाला समजून आली नाही. या गोलंदाजीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

क्रिकेट इतिहासात असे अनेक गोलंदाज होऊन गेले ज्यांची गोलंदाजी अॅक्शन समजणं हे फलंदाजांसाठी मोठं टास्क होतं. ज्यात सोहेल तन्वीर आणि आयपीएलमधील कौशिक या गोलंदाजांचा समावेश आहे. हे गोलंदाज आपल्या आगळ्या वेगळ्या गोलंदाजी अॅक्शनमुळे फलंदाजांसाठी धोकादायक ठरत होते.

ज्या गोलंदाजांची गोलंदाजी अॅक्शन सर्वाधिक कॉपी केली जाते, अशा गोलंदाजांमध्ये लसिथ मलिंगा आणि जसप्रीत बुमराह हे सर्वोच्च स्थानी आहेत. मलिंगा आयपीएल स्पर्धेतील सर्वोत्तम गोलंदाजांपैकी एक आहे. त्याने या स्पर्धेत गोलंदाजी करताना १७० गडी बाद केले होते. तर जसप्रीत बुमराहने आतापर्यंत १६५ गडी बाद केले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: IT क्षेत्रातील महिलांच्या शोषण प्रकरणी महिला बालकल्याण विभाग लक्ष घालणार

पुण्याच्या येरवडा मनोरुग्णालयात ड्रग्ज, कंडोमचा साठा; प्रशासन झोपलंय का?

Airport Fire: मुंबई विमानतळावर आगीची घटना; सर्वत्र धूर, प्रवाशांची पळापळ

यापुढे कोणत्या लाडक्या बहिणींना ₹ १५०० मिळणार; eKYC वर बोलताना आदिती तटकरेंनी दिली महत्वाची अपडेट

ठाकरेंच्या शिवसेनेत हालचालींना वेग; आगामी काळात मोठ्या बदलाचे संकेत, VIDEO

SCROLL FOR NEXT