PV Sindhu  X Twitter
Sports

Denmark Open Watch Video : उपांत्य फेरीदरम्यान पीव्ही सिंधू, कॅरोलिना मारिन यांच्यात शाब्दिक चकमक; चेअर अंपायरने ठोठावला दंड

Denmark Open: स्पेनची अव्वल बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनसोबत पीव्ही सिंधूची शाब्दिक चकमक झालीय.

Bharat Jadhav

Denmark Open Watch Video :

भारताची स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू सध्या फॉर्म नाहीये. डेन्मार्क ओपनमध्ये सिंधू सेमी फायनलमध्ये स्पेनच्या खेळाकडून पराभूत झालीय. स्पेनची अव्वल बॅडमिंटनपटू कॅरोलिना मरीनसोबत तिचा उपांत्य फेरीचा सामना होता. या सामन्यात सिंधूचा १८- २१- , २१ - १९, ७ -२१ असा पराभव झाला. कॅरेलिनाविरूद्धचा हा सिंधूचा पाचवा पराभव ठरला. सिंधूचा पराभव झालाच शिवाय प्रतिस्पर्धी असलेल्या कॅरेलिनासोबत तिची शाब्दिक चकमकदेखील झाली. (Latest News)

सिंधू आणि मारिन या दोघांमध्ये तीव्र स्पर्धा आहे. ओडेन्समध्ये एकमेकांसमोर येण्याआधी त्या दोघी १५ वेळी आमने-सामने आल्या आहेत. दरम्यान ओडेन्स येथे सिंधू आणि कॅरोलिना यांच्यात शाब्दिक वाद झाला अन् पंचांनी दोघींनाही पिवळे कार्ड दाखवलं.  ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दोनवेळा ऑलिम्पिक पदक विजेती असलेल्या पीव्ही सिंधूचा डेन्मार्क ओपन सुपर ७५० मधील प्रवास शनिवारी ओडेन्स येथे संपला. डेन्मार्क ओपनच्या उपांत्य फेरीत स्पेनच्या कॅरोलिना मारिनने तिचा पराभव केला. पहिल्या दोन गेममध्ये दोघींनी प्रत्येकी एक एक सेट जिंकला. यामुळे दोघांमध्ये चुरशीची लढत होती. तर अंतिम गेममध्ये सिंधूचा पराभव झाला. याचदरम्यान या दोघी खेळाडूंमध्ये वाद झाला. ज्यामुळे चेअर अंपायरला गैरवर्तनासाठी दोघांना पिवळे कार्ड दाखवावे लागले.

हा वाद अंतिम गेममध्ये झाला. यावेळी मारिनने ९-२ अशी आघाडी घेतली होती. दरम्यान सिंधूला तयार होण्यासाठी पुरेसा वेळ न देता मारिनने गेम सुरू केला. त्यावेळी सिंधू कॅरोलिना समजू लागली, तेव्हा दोघांचा वाद झाला. सिंधू तयार नसतानाही कॅरोलिना कोर्टात सिंधूच्या बाजूने शटल ड्रॅग करण्याचा प्रयत्न करत होती. त्यानंतर दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊ लागली. त्यानंतर अंपायरने दोघांना पिवळे कार्ड दाखवले. त्यानंतर मारिन अधिकाऱ्याकडे गेली आणि तिला हे का दाखवले जात आहे असा युक्तिवाद करू लागली.

दरम्यान चेअर अंपायर दोघांना तंबी देण्याची ही पहिली वेळ नव्हती. आधी अंपायरने दोन्ही खेळाडूंना सेलिब्रेशन कमी आवाजात करा असं सांगितलं होतं. पीव्ही सिंधूने शुक्रवारी उपांत्यपूर्व फेरीत थायलंडच्या सुपानिदा कातेथोंगचा पराभव करून उपांत्य फेरीत प्रवेश केला होता. तिने हा सामना सरळ गेममध्ये (२१-१९, २१-१२ ) असा जिंकला होता. तर मरिनने उपांत्यपूर्व फेरीत चिनी तैपेईच्या ताय त्झू यिंगचा १९-२१,२१-१५ , २१-१८ असा पराभव केला होता.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Viral Video: 10 सेकंदात धावत्या बसला आग; जीवाची बाजी लावत डिलीव्हरी बॉयने वाचवले प्रवाशांचे प्राण, थरारक व्हिडीओ व्हायरल

Pune Police : पुणे पोलीस दलात मोठी कारवाई, एकाच वेळी तब्बल ३२ पोलिसांची बदली, कारणं आले समोर

Maharashtra Live News Update : दहिसरहुन गुंदवलीला येणाऱ्या मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाड

IIM Mumbai Recruitment: कोणत्याही परीक्षेशिवाय मिळणार IIM मुंबईत नोकरी; विविध पदांसाठी भरती; अर्ज कसा करावा?

Mumbai : मंत्रालयातील त्या लिपिकावर कारवाई; तोपर्यंत काम थांबवलं, नरहरी झिरवळ यांचे निर्देश

SCROLL FOR NEXT