gautam gambhir with vvs laxman saam tv
Sports

Team India Head Coach: टीम इंडियाचा हेड कोच ठरला! विषय 'गंभीर',पण लक्ष्मणचीच चर्चा

India Tour Of Zimbabwe: भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप २०२४ नंतर झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेनंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. राहुल द्रविडनंतर भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक कोण होणार? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. या पदासाठी गौतम गंभीरचं नाव आघाडीवर आहे. मात्र याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. गौतम गंभीर हे पद लवकरच स्विकारणार हे जवळजवळ निश्चित आहे. दरम्यान माध्यमातील वृत्तामध्ये असा दावा करण्यात आला आहे की, गौतम गंभीर आधी व्हीव्हीएस लक्ष्मण भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक होऊ शकतात.

टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर रवाना होणार आहे. पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, या दौऱ्यावर गौतम गंभीरऐवजी व्हीव्हीस लक्ष्मण भारतीय संघासोबत मुख्य प्रशिक्षक म्हणून जाऊ शकतात. ते सध्या नॅशनल क्रिकेट अकॅडमीच्या चीफच्या भूमिकेत आहेत. गौतम गंभीरच्या नावावर शिक्कामोर्तब झालं, तरीदेखील तो झिम्बाब्वे दौऱ्यावर जाण्याची शक्यता खूप कमी आहे. याबाबत कुठलीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

व्हीव्हीएस लक्ष्मण मुख्य प्रशिक्षकच्या भूमिकेत दौऱ्यावर जाण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील राहुल द्रविडच्या अनुपस्थितीत व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावली आहे. बीसीसीआयच्या सुत्राने पीटीआयला दिलेल्या माहितीत म्हटले की,' व्हीव्हीएस लक्ष्मण आणि नॅशनल क्रिकेट अकॅडमीचे काही सदस्य भारतीय संघासोबत झिम्बाब्वे दौऱ्यावर जाणार असल्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. जेव्हा जेव्हा राहुल द्रविडने विश्रांती घेतली, त्यावेळी व्हीव्हीएस लक्ष्मण आणि त्यांच्या टीमने पुढाकार घेतला आहे.'

झिम्बाब्वे दौऱ्यानंतर भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर गौतम गंभीर मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यभार स्विकारु शकतो. भारतीय संघाला या दौऱ्यावर ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळायची आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT