virat kohli with rohit sharma yandex
क्रीडा

Duleep Trophy 2024: मोठी बातमी!विराट- रोहित दुलीप ट्रॉफी खेळणार; या दिवशी होणार स्पर्धेला सुरुवात

Virat Kohli Rohit Sharma In Duleep Trophy: भारतीय संघातील अनुभवी खेळाडू विराट कोहली आणि रोहित शर्मा हे दुलीप ट्रॉफीत खेळणार असं म्हटलं जात आहे. दरम्यान या स्पर्धेला केव्हा सुरुवात होणार? जाणून घ्या.

Ankush Dhavre

Indian Players Will Play Duleep Trophy 2024: भारतीय खेळाडू सध्या विश्रांतीवर आहे. भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका पार पडली. या मालिकेतील टी-२० मालिकेत भारतीय संघाने ३-० ने बाजी मारली होती. तर वनडे मालिकेत भारतीय संघाला २-० ने पराभवाचा सामना करावा लागला. दर ४० दिवस ब्रेकवर असलेल्या भारतीय खेळाडूंन दुलीप ट्रॉफी (Duleep Trophy) खेळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

बांगलादेशचा संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. या मालिकेसाठी भारतीय संघाची निवड केली जाणार आहे. संघ निवड करणं सोपं जावं म्हणून बीसीसीआयची अशी इच्छा आहे की, भारतीय खेळाडूंनी दुलीप ट्रॉफी खेळावी.

हे खेळाडू दुलीप ट्रॉफी खेळणार?

भारतीय संघातील खेळाडू अक्षर पटेल, रविंद्र जडेजा, केएल राहुल,सूर्यकुमार यादव, शुभमन गिल आणि कुलदीप यादव यांनाही दुलीप ट्रॉफी खेळण्यास सांगण्यात आलं आहे, असं म्हटलं जात आहे. तर रोहित शर्मा आणि विराट कोहलीसुद्धा (Virat Kohli) या स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात. जसप्रीत बुमराहला बांगलादेशविरुद्ध होणाऱ्या कसोटी मालिकेत खेळणार की नाही? हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे त्याचं दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळणं कठीण दिसून येत आहे.

कधी होणार दुलीप ट्रॉफी स्पर्धेतील सामने?

दुलीप ट्रॉफी स्पर्धेला ५ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. तर हे सामने २४ सप्टेंबरपर्यंत सुरु राहणार आहेत. तर भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेबद्दल बोलायचं झालं, तर या मालिकेला १९ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. अजित आगरकरांच्या अक्ष्यक्षतेखालील निवड समिती, अ,ब,क आणि ड संघांची निवड करणार आहे.

इशान किशनचं कमबॅक होणार?

आगामी दुलीप ट्रॉफीसाठी बीसीसीआय इशान किशनचा संघात समावेश केला जाऊ शकतो. इशान किशन आणि श्रेयस अय्यरने रणजी ट्रॉफी खेळण्यास नकार दिल्यामुळे त्यांची केंद्रीय करारातून सुट्टी करण्यात आली होती. मात्र हे खेळाडू आता दुलीप ट्रॉफी स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतात.

श्रेयस अय्यरला भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेत कमबॅक करण्याची संधी मिळाली. तर इशान किशनला भारतीय संघात कमबॅक करायचं असेल, तर दुलीप ट्रॉफी स्पर्धेतू चांगली कामगिरी करावी लागणार आहे.

तसेच भारतीय संघातील अनुभवी खेळाडू चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणेची दुलीप ट्रॉफीसाठी निवड केली जाणार नाहीये, असं म्हटलं जात आहे. त्यामुळे या दोघांचेही भारतीय संघात कमबॅक करण्याचे दार जवळजवळ बंद झाले आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: सकाळी डॉक्टरचं कर्तव्य अन् रात्री UPSC चा अभ्यास; IPS डॉ. आदिती उपाध्याय यांचा प्रेरणादायी प्रवास

Nandurbar News : धक्कादायक.. गर्भवती महिलेचा रस्त्यातच गर्भपात; रस्ता नसल्याने बांबुची झोळीतून जीवघेणा प्रवास

महायुतीने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिलं, एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य

Voter ID: दोन मतदार ओळखपत्र आहेत? होऊ शकते जेल; कारण काय? जाणून घ्या

Gold Rate Today : सोनं झालं स्वस्त! आठवड्याच्या पहिल्याच दिवशी सोन्याच्या दरात घसरण, पाहा सोन्याचा आजचा भाव

SCROLL FOR NEXT