virat kohli saam tv
Sports

Virat Kohli Record: केवळ 102 धावा करताच विराट रचणार इतिहास; सचिननंतर असा कारनामा करणारा ठरणार दुसराच भारतीय

IND vs WI: या सामन्यात १०२ धावा करताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

Ankush Dhavre

Virat Kohli Records In ODI: भारतीय संघाचा दिग्गज फलंदाज विराट कोहली वनडे क्रिकेटमध्ये इतिहास रचण्यापासून केवळ १०२ धावा दूर आहे. भारत आणि वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये ३ वनडे सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे.

या मालिकेतील पहिला वनडे सामना आज बार्बाडोसच्या मैदानावर रंगणार आहे. या सामन्यात १०२ धावा करताच विराट कोहलीच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद होणार आहे.

वेस्टइंडीज विरुद्धच्या पहिल्या सामन्यात १०२ धावा विराट कोहली वनडे कारकिर्दीत १३ हजार धावा पूर्ण करणार आहे. विराट कोहली भारतीय संघासाठी असा कारनामा करणारा सचिन तेंडुलकरनंतर केवळ दुसराच फलंदाज ठरणार आहे.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ ४ असे फलंदाज आहेत ज्यांना हा कारनामा करता आला आहे. तर १०२ धावांचा पल्ला गाठताच तो असा कारनामा करणारा पाचवा फलंदाज ठरला आहे. आतापर्यंत विराट कोहलीने आपल्या वनडे कारकिर्दीतील २७४ सामन्यांमध्ये १२,८९८ धावा केल्या आहेत. (Virat Kohli Record)

सचिननंतर असा कारनामा करणारा दुसराच फलंदाज..

भारतीय क्रिकेटच्या इतिहासात असा कारनामा करणारा विराट कोहली दुसरा भारतीय फलंदाज ठरणार आहे. तर वर्तमान क्रिकेटमध्ये असा कारनामा करणारा तो पहिलाच फलंदाज ठरणार आहे. विराटच्या नावे वनडे क्रिकेटमध्ये १२,८९८ धावांची नोंद आहे. तर सचिन तेंडुलकरने १८,४२६ धावा करण्याची नोंद आहे. (Latest sports updates)

वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

१. सचिन तेंडुलकर (भारत) - १८,४२६ धावा

२. कुमार संगकारा (श्रीलंका) - १४,२३४ धावा

३. रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) - १३,७०४ धावा

४. सनथ जयसूर्या (श्रीलंका) - १३,४३० धावा

५. विराट कोहली (भारत) - १२,८९८ धावा

आंतरराष्ट्रीय क्रिकेटध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज..

१. सचिन तेंडुलकर (भारत) - ३४५५७ धावा

२. कुमार संगकारा (श्रीलंका) - २८०१६ धावा

३. रिकी पॉंटिंग (ऑस्ट्रेलिया) - २७४८३ धावा

४. महेला जयवर्धने (श्रीलंका) - २५९५७ धावा

५. विराट कोहली (भारत) - २५५८२ धावा

६. जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रीका) - २५५३४ धावा

७. राहुल द्रविड़ (भारत) - २४२०८ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai : मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय! मोबाईल टॉवर उभारणीच्या नियमांत बदल; जाणून घ्या

Good News: मोठी बातमी! राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा, दुष्काळात फडणवीस सरकारचा आणखी एक महत्वाचा निर्णय

Maharashtra News Live Update: लातूरमध्ये भीषण दुष्काळ, शेतीला फटका; बळीराजा चिंतेत

Young Cricketer Death: टीम इंडियाच्या खेळाडूने संपवलं आयुष्य; क्रिकेट विश्वात खळबळ

Famous Actor : मळके कपडे, धड उभंही राहता येईना; प्रसिद्ध अभिनेत्याला नेमकं झालं तरी काय? व्हायरल VIDEO नं चाहते चिंतेत

SCROLL FOR NEXT