virat kohli twitter
क्रीडा

Virat Kohli In Ayodhya: अयोध्येत विराटची एन्ट्री? एक झलक पाहण्यासाठी चाहत्यांची उडाली झुंबड; Video

Ankush Dhavre

Virat Kohli In Ayodhya Viral Video:

लवकरच भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ होणार आहे. या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला २५ जानेवारीपासून प्रारंभ होणार आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वीच भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे.

संघातील प्रमुख खेळाडू विराट कोहली सुरुवातीच्या २ कसोटी सामन्यांमधून बाहेर झाला आहे. विराट कोहलीला २२ जानेवारी रोजी पार पडलेल्या राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आमंत्रण दिलं गेलं होतं. तो या सोहळ्याला हजेरीला लावणार असा अंदाजही वर्तवला गेला होता.

प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला दिग्गज खेळाडूंची हजेरी..

राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला अनेक स्टार क्रिकेटपटूंनी हजेरी लावली होती. ज्यात सचिन तेंडुलकर, अनिल कुंबळे आणि रविंद्र जडेजासारख्या दिग्गज खेळाडूंचा समावेश होता. यासह एमएस धोनी,विराट कोहली आणि विरेंद्र सेहवागसारख्या खेळाडूंनाही आमंत्रण दिलं गेलं होतं. मात्र हे खेळाडू प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला उपस्थित नव्हते. दरम्यान हा सोहळा पार पडल्यानंतर सोशल मीडियावर एक व्हिडिओ तुफान व्हायरल होऊ लागला आहे.

विराट कोहली अयोध्येला येणार अशी चर्चा सुरु होती. या सोहळ्याच्या एक दिवसापूर्वी विराट कोहली अयोध्येत दाखल झाल्याची माहितीही समोर आली होती. मात्र तो या सोहळ्याला उपस्थित नव्हता. विराट तिथे नसतानाही विराटची जोरदार चर्चा रंगली आहे. ही चर्चा रंगण्यामागचं कारण म्हणजे विराट कोहलीचा ड्युप्लिकेट. (Latest sports updates)

विराटचा व्हिडिओ व्हायरल..

विराट अयोध्येत नव्हता. मात्र त्याचा ड्युप्लिकेट अयोध्येत दाखल झाला होता. भारतीय संघाची जर्सी आणि हुबेहूब विराटसारखंच चालताना पाहून क्रिकेट चाहत्यांनी एकच गर्दी केली. क्रिकेट फॅन्स त्याच्यासोबत सेल्फी घेण्यासाठी एकच गर्दी करु लागले. काहींनी ड्युप्लिकेट विराटसोबत सेल्फी घेतले. तर काहींनी ऑटोग्राफ घेतले. त्याला क्रिकेट चाहते चिकू चिकू नावाने हाक मारत होते. हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Badlapur Case : बदलापूर अत्यार प्रकरणी मोठी अपडेट; एसआयटीकडून कोर्टात २ चार्जशीट दाखल, पाहा व्हिडिओ

Bharat Gogavale: महामंडळावर बोळवण, मंत्रिपदाची हुलकावणी; भरत गोगावले एसटीचं अध्यक्षपद स्वीकारणार?

NPS Vatsalya Scheme: तुमच्या मुलांनाही मिळणार पेन्शन! महिन्याला गुंतवा हजार, मुलं होतील कोट्याधीश; जाणून घ्या काय आहे योजना

UPI स्कॅम कसा ओळखायचा? तुमचे पैसे सुरक्षित करण्यासाठी या टिप्स करा फॉलो

Mhada Lottery 2024: म्हाडा लॉटरी घरांसाठी शेवटच्या दिवशी 'पेमेंट फेल'चा फटका! घराचे स्वप्न पूर्ण होणार का? शेकडो अर्जदार चिंतेत

SCROLL FOR NEXT