virat kohli saam tv
Sports

Virat Kohli Record: किंग कोहली रचणार इतिहास! श्रीलंका दौऱ्यावर हे 'विराट' रेकॉर्ड करण्याची संधी

IND vs SL, Virat Kohli Record: भारत आणि श्रीलंका या दोन्ही संघांमध्ये वनडे आणि टी-२० मालिकेचा थरार रंगणार आहे. या मालिकेत विराटला मोठे रेकॉर्ड आपल्या नावावर करण्याची संधी असणार आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाच्या श्रीलंका दौऱ्याची घोषणा झाली आहे. दोन्ही संघांमध्ये ३ वनडे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. या दौऱ्यावरील टी-२० मालिकेला २७ जुलैपासून प्रारंभ होणार आहे. त्यानंतर ३ वनडे सामन्यांचा थरार रंगणार आहे. या दोन्ही मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली विश्रांतीनंतर परतणार आहे. दरम्यान वनडे मालिकेत कमबॅक करताच त्याला २ मोठे रेकॉर्ड करण्याची संधी असणार आहे.

विराट कोहली हा भारतीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. काही दिवसांपूर्वीच झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलनंतर त्याने टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे तो आता भारतीय संघाकडून टी-२० क्रिकेट खेळताना दिसून येणार नाही. श्रीलंकेविरुद्ध होणाऱ्या टी-२० मालिकेनंतर वनडे मालिका सुरु होणार आहे. महिन्याभराच्या विश्रातीनंतर विराट कोहली पुन्हा एकदा मैदानात खेळताना दिसणार आहे. विराटसह रोहित शर्मादेखील या मालिकेतून खेळताना दिसणार आहे.

विराटला हे २ मोठे रेकॉर्ड मोडण्याची संधी

विराट कोहलीच्या नावे एकापेक्षा एक मोठे रेकॉर्ड करण्याची नोंद आहे. या यादीत आणखी २ मोठ्या रेकॉर्ड्सची भर पडू शकते. विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २७ हजार धावा करण्यापासून ११६ धावा दुर आहे. तर वनडे क्रिकेटमध्ये १४ हजार धावा करण्यापासून तो अवघ्या १५२ धावा दुर आहे. आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो चौथ्या स्थानी आहे. तर सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम हा मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिने ३४,३५७ धावा केल्या आहेत.

आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

सचिन तेंडुलकर- ३४३५७ धावा

कुमार संगकारा - २८०१६ धावा

रिकी पाँटिंग- २७४८३ धावा

विराट कोहली - २६८८४ धावा

महेला जयवर्धने- २५९५७ धावा

जॅक कॅलिस- २५५३४ धावा

राहुल द्रविड- २४२०८ धावा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Stroke warning signs: स्ट्रोक येण्यापूर्वी तुमच्या शरीरात होतात 'हे' ६ बदल; सामान्य लक्षणं समजून दुर्लक्ष करू नका

Viral Video: 'सरपंच खाली उतरला...', विद्यार्थ्यांनी अडवला रस्ता; चिखलफेक करत.. व्हिडिओ व्हायरल

Tejswini Pandit: दिलखुलास हसणारी...; आईच्या निधनानंतर लेक तेजस्विनी पंडीतची पहिली भावनिक पोस्ट

Maharashtra Live News Update: वाशिम जिल्ह्यात 14 मंडळात अतिवृष्टी, हजारो हेक्टर शेतीचे नुकसान

नो पार्किंग क्षेत्रात कॅबिनेट मंत्र्याची कार; पोलिसांनी क्रेनने उचलून नेली, व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT