Virat Kohli saam tv
Sports

T20 World Cup : आता तर हद्दच झाली, नेट प्रॅक्टिस करताना विराट कोहली चाहत्यांवर भडकला, पाहा Video

खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी चाहत्यांनी नेट्सजवळ एकच जल्लोष केला, व्हिडिओ व्हायरल

नरेश शेंडे

नवी दिल्ली : क्रिडाविश्व असो वा फिल्मी दुनिया चाहते नेहमीच स्टार्सचे दिवाने असतात. भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीचा जलवाही असाच काहिसा आहे. विरोट कुठेही दिसला की,चाहते त्याला घेरतात. विराटसोबत फोटो,सेल्फी, व्हिडिओ काढणं तर नेहमीच सुरु असतं, पण यावेळी चाहत्यांनी तर हद्दच केली.

ऑस्ट्रेलियात टी20 वर्ल्डकपचा थरार सुरु झाला असून भारताचा पहिला सामना 23 ऑक्टोबरला पाकिस्तान विरुद्ध मेलबर्नच्या मैदानात रंगणार आहे. यासाठी टीम इंडियाचे (Indian cricket team) खेळाडू मेलबर्नमध्ये सरावर करत आहेत. खेळाडूंचा सराव पाहण्यासाठी क्रिकेट चाहत्यांनी नेट्सजवळ एकच जल्लोष केला. चाहत्यांचा या जल्लोषामुळं विराटला सराव करण्यात अडचण निर्माण होत होती. त्यामुळे विराट चाहत्यांवर चांगलाच भडकला आणि त्याने चाहत्यांना वॉर्निंगही दिली. (Virat kohli latest video update)

मिशन टी20 वर्ल्डकप 2022 साठी विराट कोहली (virat kohli) ऑस्ट्रेलियात सराव करत आहे. याचदरम्यान विराटला त्याच्या चाहत्यांनी परेशान केलं. विराट नेट प्रॅक्टिस करत असताना चाहत्यांनी जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली. विराटला सतत हाक मारल्यानंतर अखेर विराट चाहत्यांवर भडकला आणि त्यानंतर पुन्हा नेट्समध्ये जाऊन सराव करू लागला.

त्यानंतर चाहतेही विराटला म्हणाले, तु जेव्हा विश्रांती घेशील,तेव्हा पुन्हा तुला आवाज देऊ. म्हणजेच यावरून एक गोष्ट स्पष्ट झाली की, चाहते विराटवर नाराज झाले नाहीत, तर विराटला सरावादरम्यान अडथळा निर्माण होत आहे, हे त्यांना कळलं. हा संपूर्ण प्रकार कॅमेरात कैद झाल्याने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.

'किंग तर एकच आहे ना, म्हणून बोलणार'

विराट कोहली नेट्समध्ये बॅटिंग प्रॅक्टिस करताना व्हिडिओमध्ये दिसत आहे. नेट्सच्या पाठीमागे विराटचे चाहते उभे आहेत. या चाहत्यांनी हा व्हिडिओ बनवला आहे. कोहलीने सरावादरम्यान एक शॉट मारला, तेव्हा चाहते बोलले, हा तर आउट ऑफ स्टेडिअम आहे. त्यानंतर कोहली चाहत्यांना म्हणाला, 'यार प्रॅक्टिस के टाईम में बोलो मत, डिस्ट्रक्शन होती है.'त्यानंतर चाहत्यांनी म्हटलं, 'ओके भाई, ठीक आहे, जेव्हा तुम्ही रिलॅक्स व्हाल, तेव्हा आम्ही बोलू. किंग आहे तर बोलणारच. किंग तर एकच आहे ना भाई.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Raja Raghuji Bhosle Sword: वाघ नखानंतर राजांची तलवार महाराष्ट्रात येणार; लंडनमधील तलवार हस्तांतरित

Maharashtra Politics: आंबेडकर-ठाकरे एकत्र येणार? वंचितची मोठी घोषणा, पालिका निवडणुकीत नवी समीकरणं

India Population: भारताच्या लोकसंख्या वाढीला ब्रेक; मूल नको असलेल्या कुटुंबांची संख्या वाढली

Mumbai Local Accident : मुंबई लोकलच्या टपावर चढला; तरुणासोबत क्षणात होत्याचं नव्हत झालं

Superfood For Monsoon: पावसाळ्यात निरोगी आरोग्यासाठी वरदान आहेत 'हे' सूपरफूड, आजच आहारात करा समावेश

SCROLL FOR NEXT