Virat Kohli  Saam TV
Sports

Virat Kohli Funny Video : 'वॉटर बॉय' बनून आला अन् भाव खाऊन गेला, विराटच्या भन्नाट व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ

Funny Video : विराट कोहलीला देखील आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

प्रविण वाकचौरे

Virat Kohli News :

आशिया चषक 2023 च्या सुपर 4 चा शेवटचा सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात खेळला जात आहे. आजच्या सामन्यात भारतीय संघात 5 बदल करण्यात आले. अनेक महत्त्वाच्या खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. विराट कोहलीला देखील आजच्या सामन्यात विश्रांती देण्यात आली आहे.

विराट कोहलीच्या जागी तिलक वर्माने आजच्या सामन्यातून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण केलं आहे. सामन्यात टीम इंडिया प्रथम फिल्डिंगला उतरली. मात्र आजच्या प्लेईंग 11 मध्ये नसतानाही किंग कोहलीने मैदान गाजवलं. विराटचा एक भन्नाट व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहे.

विराट आज वॉटर बॉय म्हणून मैदानात उतरला होता. मात्र विराटची मैदानात एन्ट्रीच भाव खाऊन गेली. खेळाडूंना ब्रेकमध्ये विराट ड्रिंक्स घेऊन येताना दिसला. याआधीही तो हे करताना दिसला होता, पण आज विराट मैदानात ज्या प्रकारे धावत आला ते पाहून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर हसू उमटलं. (Latest sports updates)

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये विराट कोहली मस्ती करत मैदानात येताना दिसत आहे. विराट कोहली ब्रेकच्या वेळी खेळाडूंसाठी ड्रिंक्स घेऊन जात आहे. यावेळी विराट कोहली खूप उत्साही आणि मस्तीच्या मूडमध्ये दिसत आहे. विचित्र पद्धतीने उड्या मारत विराट मैदानात आला. विराटला पाहून मैदानातील खेळाडूंनाही हसू आवरलं नाही.

भारत विरुद्ध श्रीलंका अंतिम सामना

भारतीय संघ आशिया चषकाच्या अंतिम फेरीत पोहोचला आहे. टीम इंडिया अंतिम सामन्यात श्रीलंकेविरुद्ध भिडणार आहे. 17 सप्टेंबर रोजी कोलंबोमध्ये हा सामना होणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

पोलीस खात्यात बदल्यांचा 'पार्ट-२'! एका अधिकाऱ्याची तडकाफडकी बदली, दुसऱ्याची बदलीनंतरही 'तीच' खुर्ची कायम

Maharashtra News Live Update: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिर्डी विमानतळावर दाखल

Raksha Bandhan 2026: रक्षाबंधनाला सोने-चांदीची राखी बांधावी का? जाणून घ्या पारंपारिक धाग्याच्या राखीचे खास महत्त्व

केंद्र सरकारच्या ५४ वेबसाइट्सवर हल्ला! तपासाचे धागेधोरे थेट पुण्याच्या जुन्नरमध्ये; मनी ट्रान्सफर कनेक्शनमुळे खळबळ

Pune Traffic Update : पुणेकरांनो उद्या घराबाहेर पडण्यापूर्वी 'हे' वाचा! ईदमुळे शहरातील वाहतुकीत मोठे बदल

SCROLL FOR NEXT