Virat Kohli Fan Viral Video X (Twitter)
Sports

Virat Kohli : कोहलीवरचं 'विराट' प्रेम! हातात RCB चा फ्लॅग, अंगात 18 नंबरची जर्सी; व्हिडीओ होतोय व्हायरल

Virat Kohli Fan Viral Video : विराट कोहलीच्या एका फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये विराटचा चाहता त्यांच्या मित्रांसोबत एका लाकडी इमारतीवर उभा असल्याचे पाहायला मिळते.

Yash Shirke

IPL 2025 : विराट कोहलीची फॅन फॉलोइंग प्रचंड मोठी आहे. भारतासह जगभरात त्याचे चाहते आहे. आयपीएलच्या इतिहासात विराटने तुफान कामगिरी केली आहे. यंदाच्या सीझनमध्येही तो चांगला खेळ करेल असा चाहत्यांना आशा आहे. विराट आणि आरसीबीचीची सोशल मीडियावर मोठी क्रेझ पाहायला मिळते.

दरम्यान विराटच्या एका फॅनचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या चाहत्याने त्याच्या मित्रांसह बांबूच्या मदतीने बांधलेल्या एका गगनचुंबी इमारतीवर उभे राहून विराटला मानवंदना दिली आहे. या चाहत्याने विराटची १८ नंबरची जर्सी घातली आहे. त्याने आणि त्याच्या मित्रांनी हातात आरसीबीचा झेंडा घेत 'इ साल कप नम दे'चा नारा दिला आहे.

सोशल मीडियावर हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. या व्हिडीओमधील युवकाचे नाव मनोहर मरप्पा असे आहे. या व्हिडीओखाली विराटच्या इतर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. या व्हिडीओवरुन विराट कोहलीची क्रेझ किती आहे याचा अंदाज येतो. या व्हिडीओला २.५ मिलियन व्ह्यूज मिळाले आहेत.

आयपीएल २०२५ च्या नव्या सीझनला आज सुरुवात होणार आहे. पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना गतविजेते कोलकाता जिंकणार की बंगळुरू पहिला सामना जिंकत विजयी सुरुवात करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jeera water vs saunf water: जीरा की बडीशेप...; सकाळी-सकाळी कोणतं पाणी पिणं तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर

Maharashtra News Live Update: शालार्थ आयडी घोटाळाप्रकरणी जळगावात नाशिकच्या विशेष पथकांची धडक

PM Kisan Yojana : पीएम किसानचा 24वा हप्ता कधी येणार? ऑक्टोबरमध्ये खात्यात जमा होणार ₹2,000? जाणून घ्या मोठी अपडेट

Sugar Price: मोठी बातमी! साखरेचे भाव १०० पार जाणार? सणासुदीच्या काळात सर्वसामान्यांना बसणार झटका

New Rules India : आजपासून १० नवे बदल, LPG सिलेंडरपासून बँकिंगपर्यंत नियम बदलले; तुमच्यावर काय परिणाम होणार? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT