Virat Kohli BCCI
Sports

Virat Kohli Record: विराट कोहली उद्याच्या सामन्यात इतिहास रचणार? फक्त एक पाऊल दूर

एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली सचिनसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

साम टिव्ही ब्युरो

Virat Kohli Record: भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना गुरुवारी कोलकाता येथील ईडन गार्डन्सवर खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यात भारताने दणदणीत विजय नोंदवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

पहिल्या सामन्यात विराट कोहलीने शतक झळकावले होते. या शतकासह त्याने सचिन तेंडुलकरच्या शतकांच्या विक्रमाशी बरोबरी केली. वनडे क्रिकेटमध्ये कोणत्याही एका संघाविरुद्ध सर्वाधिक शतके झळकावण्याच्या बाबतीत कोहली सचिनसोबत संयुक्तपणे पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.

कोहलीने श्रीलंकेविरुद्धच्या 48 सामन्यात 9 शतके झळकावली आहेत. यादरम्यान त्याने 11 अर्धशतकेही झळकावली आहेत. त्याने वेस्ट इंडिजविरुद्धही 42 वनडेमध्ये 9 शतके झळकावली आहेत.

सचिनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 9 शतके झळकावली आहेत. त्याने 71 सामन्यांमध्ये 15 अर्धशतकेही केली आहेत. (Sports News)

रोहित शर्मा या बाबतीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 शतके झळकावली आहेत. त्याने 40 डावात 8 अर्धशतकेही केली आहेत.

एकाच संघाविरुद्ध सर्वाधिक एकदिवसीय शतके

>> विराट कोहली विरुद्ध वेस्ट इंडिज - 9 शतके

>> विराट कोहली विरुद्ध श्रीलंका - 9 शतके

>> सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया - 9 शतके

विशेष म्हणजे भारत आणि श्रीलंका यांच्यातील वनडे मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळवला जाणार आहे. या सामन्यात कोहली अनेक विक्रम मोडू शकतो. ईडन गार्डन्सचे मैदानावर रोहित शर्माची कामगिरीही चांगली आहे. या मैदानावर रोहितने श्रीलंकेविरुद्ध २६४ धावांची खेळी खेळली होती. एकदिवसीय क्रिकेटमधील एका डावातील ही सर्वोत्तम धावसंख्या आहे आणि ती अद्याप कोणीही मोडू शकलेले नाही.

टीम इंडिया प्लेइंग इलेव्हन?

रोहित शर्मा, शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, हार्दिक पंड्या, अक्षर पटेल, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमरान मलिक, युझवेंद्र चहल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Asia Cup 2025 : आशिया कपमध्ये भारताची फायलनमध्ये धडक; विरोधीला संघाला पाणी पाजलं

Uttarkashi Cloudburst: उत्तरकाशीत पुन्हा ढगफुटी, नौगाव बाजार पुरात वाहिला, व्हिडिओ व्हायरल

Anant Chaturdashi 2025 live updates : पुण्यात विसर्जनासाठी गेलेले ४ जणांचा पाण्यात बुडून मृत्यू

Ganesh visarjan 2025 : गणपतीचे विसर्जन करताना विपरीत घडलं, तीन तरुण पाण्यात वाहून गेले

Pune News: पुण्यात दगडूशेठ गणपतीची महाआरती पाहा VIDEO

SCROLL FOR NEXT