virat kohli twitter
Sports

Virat Kohli Wicket: विराट कोहली आऊट नव्हताच! मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं, Rohit भडकला -VIDEO

IND vs BAN, 1st Test Day 2: पहिल्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहली आऊट नव्हता. मात्र एका चुकीमुळे माघारी परतावं लागलं. नेमकं काय घडलं? जाणून घ्या.

Ankush Dhavre

IND vs BAN, Virat Kohli Wicket: भारत आणि बांगलादेश यांच्यात सुरू असलेल्या पहिल्या सामन्यातील दुसऱ्या दिवसाची समाप्ती झाली आहे. दुसऱ्या डावातही भारतीय संघाला हवी तशी सुरुवात मिळू शकलेली नाही. रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल पाठोपाठ विराट कोहलीही स्वस्तात माघारी परतला आहे. मात्र विराट कोहली आऊट नव्हताच. रिप्ले पाहिला असता रोहित शर्माही भडकल्याचे पाहायला मिळाले आहे.

पहिल्या डावात ६ धावांवर तंबूत परतणाऱ्या विराटला या डावात चांगली सुरुवात मिळाली होती. त्यामुळे तो मोठी खेळी करणार असं वाटत होतं. मात्र तो मिराझच्या फिरकीच्या जाळ्यात अडकला. मिराझने टाकलेला चेंडू विराटच्या पॅडला जाऊन धडकला. मिराझने अपील केली असता, अंपायरने त्याला बाद घोषित केलं. विराटलाही विश्वास बसत नव्हता. त्याने जाऊन गिलसोबत चर्चा केली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर विराट डीआरएस ने घेताच माघारी परतला. इथेच त्याची मोठी चूक झाली.

ज्यावेळी रिप्ले दाखवण्यात आला, त्यावेळी चेंडू पॅडला लागण्यापूर्वी बॅटला लागल्याचं दिसून आलं. स्निकोमध्ये चेंडू बॅटला स्पर्श होऊन गेल्याचं दिसून आलं. हे पाहून कर्णधार रोहित शर्मा भडकला. त्याचं म्हणणं होतं की, विराटने डीआरएस घ्यायला हवा होता. विराट १७ धावा करत माघारी परतला.

विराट कोहली या सामन्यातील पहिल्या डावातही फ्लॉप ठरला होता. पहिल्या डावात तो अवघ्या ६ धावा करत तंबूत परतला होता. तर रोहित शर्मादेखील ६ धावा करत माघारी परतला होता. शुभमन गिलला तर भोपळाही फोडता आला नव्हता. या डावात आर अश्विनने भारतीय संघाकडून सर्वाधिक १०८ धावांची खेळी केली. तर रविंद्र जडेजाने ८६ आणि यशस्वी जयस्वालने ५६ धावा केल्या. या खेळीच्या बळावर भारताने ३७६ धावांपर्यंत मजल मारली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मीरा-भाईंदर जैनांची नगरी'! भाजप आमदाराचं विधान, राजकीय वातावरण तापण्याची शक्यता

Asian Games: आईचं सोनं गहाण, लेकानं फडकवलं निशाण; साताऱ्याच्या लेकाचा आशियाई स्पर्धेत डंका

मुख्य निवडणूक आयुक्तांना हटवण्यासाठी २० पक्षांनी आखली रणनीती; इंडीया आघाडीचा आयोगावर धडक मोर्चा

IND vs WI 2nd ODI: गिल-रोहितचा तडाखा; वेस्ट इंडिजचा 405 धावांचा डोंगर भुईसपाट, टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय

दुष्काळात सुट्टी घेणं अधिकाऱ्यांना महागात पडणार; थेट होणार फौजदारी कारवाई

SCROLL FOR NEXT