virat kohli celebration saam tv
Sports

Virat Kohli Dance Video: चौकार मारताच विराटने केला डान्स! हटके सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय? पाहा VIDEO

Virat Kohli Celebration: विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

Ankush Dhavre

IND vs WI 1st Test: भारत विरुद्ध वेस्टइंडीज या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांच्या मालिकेला प्रारंभ झाला आहे. मालिकेतील पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर सुरु आहे. सामन्याच्या दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीपर्यंत भारतीय संघ मजबूत स्थितीत आहे.

यशस्वी जयस्वाल नाबाद १४३ तर विराट कोहली नाबाद ३६ धावांवर फलंदाजी करतोय. भारतीय संघाने आतापर्यंत २ गडी बाद ३१२ धावा केल्या असून १८२ धावांची आघाडी घेतली आहे. दरम्यान दुसऱ्या दिवसाच्या समाप्तीनंतर विराट कोहलीचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होऊ लागला आहे.

विराटचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल...

विराट कोहली हा नेहमीच आपल्या आक्रमक सेलिब्रेशनमुळे ओळखला जातो. मात्र वेस्टइंडीजविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यादरम्यान पहिला चौकार मारताच विराट कोहली डान्स करताना दिसून आला आहे. आता चौकार मारल्यानंतर डान्स करण्याचं कारण काय? असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल. तर यामागचं कारण असं की, विराट कोहलीने ८० चेंडूंचा सामना केल्यानंतर ८१ व्या चेंडूवर पहिला चौकार मारला. हा चौकार मारताच विराट कोहली डान्स करताना दिसून आला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. (Latest sports updates)

भारतीय संघाचा दबदबा कायम..

डॉमिनिका कसोटीच्या दुसऱ्या दिवशी देखील भारतीय संघाचा दबदबा पाहायला मिळाला आहे. भारतीय संघाकडून यशस्वी जयस्वाल आणि रोहित शर्माने चांगली सुरुवात करून दिली होती. दोघांनी २५६ धावांची विक्रमी भागीदारी केली. (Virat Kohli Celebration)

यासह दोघांनी आपलं शतक पूर्ण केलं. रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील १० वे शतक झळकावले. तर यशस्वीने पदार्पणाच्या सामन्यात शतक पूर्ण केलं आहे. भारतीय संघाने आतापर्यंत २ गडी बाद ३१२ धावा करत १६२ धावांची आघाडी घेतली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Election 2026: धुरळा उडाला! ५ राज्यांच्या विधानसभा निवडणुकांची घोषणा, मतदान अन् निकाल कधी? वाचा संपूर्ण वेळापत्रक

Baramati Election : महाराष्ट्रात विधानसभेच्या २ जागांसाठी निवडणुका जाहीर, मतदान कधी? निकालाची तारीख स्पष्ट

Maharashtra Live News Update: भीमा शंकर मंदिरात बंदी असतानाही खासदार निशिकांत दुबे यांनी सहपत्नीदर्शन घेतल्या प्रकरणाची चौकशी होणार

Mens Health After 40: फक्त पुरुषांनाच होतात हे ४ जीवघेणे आजार, चाळिशीतल्या पुरुषांनी आत्ताच व्हा सावध

LPG Cylinder Blast : सिलिंडरच्या भीषण स्फोटात तीन घरे उध्वस्त, दोन लहान मुलांचा होरपळून मृत्यू, ७ जण गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT