virat kohli  google
Sports

Virat Kohli Record: किंग कोहलीने रचला इतिहास! वर्ल्डकपमध्ये असा कारनामा करणारा ठरला जगातील पहिलाच फलंदाज

IND vs BAN, T20 World Cup 2024: भारतीय संघाचा स्टार फलंदाज विराट कोहलीने वर्ल्डकप स्पर्धेत मोठ्या रेकॉर्डला गवसणी घातली आहे.

Ankush Dhavre

आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सुपर ८ फेरीतील सामन्यांना जोरदार प्रारंभ झाला आहे. स्पर्धेतील ४७ वा सामना भारत आणि बांगलदेश या दोन्ही संघांमध्ये पार पडला. या सामन्यातही विराट कोहली डावाची सुरुवात करण्यासाठी मैदानावर आला होता. त्याने २८ चेंडूंचा सामना करत ३७ धावांची बहुमूल्य खेळी केली. यासह त्याने वर्ल्डकप स्पर्धेतील मोठ्या रेकॉर्डवर आपलं नाव कोरलं आहे.

विराटच्या ३००० धावा पूर्ण

विराटला या सामन्यात चांगली सुरुवात मिळाली होती. माज्ञ या सुरुवातीचं रुपांतर त्याला मोठ्या खेळीच्या रुपात करता आलं नाही. तो ३७ धावा करत माघारी परतला. यासह त्याने वर्ल्डकप स्पर्धेत ३ हजार धावा पूर्ण केल्या आहेत. असा कारनामा करणारा तो क्रिकेट इतिहासातील पहिलाच फलंदाज ठरला आहे. यापूर्वी कुठल्याच फलंदाजाला ३००० धावांचा पल्ला गाठता आला नव्हता.

भारतीय संघाने उभारला १९६ धावांचा डोंगर

या सामन्यात बांगलादेश संघाने नाणेफेक जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना रोहित आणि विराटची जोडी मैदानावर आली होती. दोघांनी मिळून आक्रमक सुरुवात केली. त्यनंतर रोहित शर्मा २३ धावा करत माघारी परतला. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर विराट अन् रिषभ पंतने डाव सांभाळला.

दोघांनी मिळून संघाची धावसंख्या ७० धावांवर पोहोचवली. विराट ३७ धावांवर फलंदाजी करुन माघारी परतला. रिषभने चौफेर फटकेबाजी केली, मात्र त्यालाही ३६ धावांवर पॅव्हेलियनची वाट धरावी लागली. शेवटी शिवम दुबे आणि हार्दिक पंड्या शो पाहायला मिळाला. शिवम दुबेने ३४ धावा केल्या. तर हार्दिक पंड्या ५० धावांवर नाबाद राहिला आणि संघाची धावसंख्या १९६ धावांवर पोहोचवली.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Manoj Jarange: एका तालुक्यातून 50 हजार गाड्या; या दिवशी भगवं वादळ मुंबईला धडकणार, मनोज जरांगेंनी दिला इशारा|VIDEO

Actor Passes Away: प्रसिद्ध अभिनेत्याचा अकाली मृत्यू; मनोरंजन विश्वावर शोककळा

Maharashtra Politics: भाजप प्रवक्त्या मुंबई हायकोर्टाच्या न्यायाधीश, आरती साठेंच्या नेमणुकीवर पवारांचा गंभीर आरोप

Onion : चाळीत ठेवलेला ७०० क्विंटल कांदा जाळला; सात लाख रुपयांचे नुकसान, अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल

Maharashtra Live News Update : नवी मुंबई महानगरपालिकेच्या कारभाराविरुद्ध स्थानिकांचे आणि माजी नगरसेवकांचे साखळी उपोषण

SCROLL FOR NEXT